Showing posts with label SSC. Show all posts
Showing posts with label SSC. Show all posts

Friday, June 17, 2022

दहावीचा निकाल जाहीर : इथे पहा निकाल

दहावीचा निकाल जाहीर : इथे पहा निकाल


SSC Result 2022:

दहावीच्या विद्यार्थ्यांसाठी आत्ताचे सर्वात मोठी बातमी, काहीच मिनिटापूर्वी दहावीचा निकाल जाहीर झाला आहे तरी सर्व विद्यार्थ्यांनी खाली दिलेल्या सरकारच्या अधिकृत वेबसाईटवर आपला निकाल चेक करावा. विद्यार्थ्यांनो खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करून आपण आपल्या आईचे नाव आणि बैठक क्रमांक टाकून आपला निकाल पाहू शकता.


महाराष्ट्र बोर्डाने SSC च्या विद्यार्थ्यांची परीक्षा ही 15 मार्च ते 4 एप्रिल च्या दरम्यान घेतल्या होत्या. तसेच HSC च्या विद्यार्थ्यांची परीक्षा ही 4 मार्च ते सात एप्रिल दरम्यान घेण्यात आल्या होत्या. या दोन्ही वर्गाच्या परीक्षेला एकूण 30 लाखाहून अधिक सहभाग नोंदवला होता.


खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करून डायरेक्ट आपला निकाल पहा..


विद्यार्थी मित्रांनो आम्ही वरील लिंक वर दहावीचा निकाल पाहण्यासाठी सरकारच्या विविध अधिकृत वेबसाईट दिलेल्या आहेत. तरी तुम्हाला तुमचा निकाल पाहायचा असेल तर तुम्ही वरील लिंक वर क्लिक करून तुम्ही तुमचा निकाल पाहू शकता. निकाल पाहण्यासाठी तुम्हाला फक्त तुमचा सीट नंबर म्हणजेच बैठक क्रमांक आणि आईचे नाव अचूकपणे टाकायचे आहे हे टाकल्यानंतर सबमिट बटनावर क्लिक केल्यावर आपला रिझल्ट आपल्याला दिसेल.



विद्यार्थी मित्रांनो, यावर्षी दहावीच्या परीक्षा साठी राज्यातून एकूण 16 लाख 39 हजार 172 जणांनी परीक्षेसाठी नोंदणी केली होती. मुख्य केंद्र आणि उपकेंद्र मिळून 21 हजारा 384 ठिकाणी दहावी या वर्गाच्या परीक्षा घेण्यात आल्या होत्या.


मित्रांनो अधिक महितीसाठी खालील केंद्रास भेट द्या


"शिवाज्ञा आपले सरकार सेवा केन्द्र”

दु. क्र. ४, राठी कॉम्प्लेक्स, राधाकृष्ण कॉलनी, बस स्टॅन्ड समोर, मोर्शी, जि. अमरावती

75070843439112012151

https://goo.gl/maps/6PMdqiPtvPETn4Ad8


तुम्हाला विविध शासकीय योजनांची माहिती, नोकरी अपडेट्स आपल्या मोबाईलवर हवी असेल तर खालील लिंक वरती क्लिक करुन WHATSAPP गृपला सामील व्हा...




Thursday, June 16, 2022

(SSC Delhi Police HC) SSC मार्फत दिल्ली पोलीस दलात हेड कॉन्स्टेबल भरती [आज शेवटची तारीख]

  

SSC Delhi Police HC Recruitment 2022


परीक्षेचे नाव:

  • दिल्ली पोलीस-हेड कॉन्स्टेबल (मिनिस्टीरियल)-पुरुष & महिला परीक्षा 2022

एकुण जागा:

  • 835 जागा

पदाचे नाव:

  • हेड कॉन्स्टेबल (मिनिस्टीरियल)

पुरूष

महिला

Total

UR

241

119

360

EWS

56

28

84

OBC

137

67

204

SC

65

32

97

ST

60

30

90

Total

559

276

835


शैक्षणिक पात्रता:

  • 12वी उत्तीर्ण
  • इंग्रजी टायपिंग 30 श.प्र.मि. किंवा हिंदी टायपिंग 25 श.प्र.मि.

ITI After 10th: राज्यात आयटीआयसाठी दीड लाख जागा



वयाची अट:

  • 01 जानेवारी 2022 रोजी 18 ते 25 वर्षे. [SC/ST: 05 वर्षे सूट, OBC: 03 वर्षे सूट]

नोकरी ठिकाण:

  • दिल्ली

Fee:

  • General/OBC: ₹100/-
  • SC/ST/ExSM/महिला: फी नाही

Online अर्ज करण्याची शेवटची तारीख:

  • 16 जून 2022 (11:00 PM)

परीक्षा (CBT):



अधिक महितीसाठी खालील केंद्रास भेट द्या..


"शिवाज्ञा आपले सरकार सेवा केन्द्र”

दु. क्र. ४, राठी कॉम्प्लेक्स, राधाकृष्ण कॉलनी, बस स्टॅन्ड समोर, मोर्शी, जि. अमरावती

75070843439112012151

https://goo.gl/maps/6PMdqiPtvPETn4Ad8


तुम्हाला विविध शासकीय योजनांची माहिती, नोकरी अपडेट्स आपल्या मोबाईलवर हवी असेल तर खालील लिंक वरती क्लिक करुन WHATSAPP व TELEGRAM गृपला सामील व्हा...



Friday, June 10, 2022

SSC Result 2022: दहावीच्या निकालाची वाट पाहताय? जाणून घ्या

 SSC Result 2022: दहावीच्या निकालाची वाट पाहताय? जाणून घ्या ताजी अपडेट

राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळामार्फत बारावीचा निकाल जाहीर करण्यात आल्यानंतर आता दहावीचे विद्यार्थी निकालाची वाट पाहत आहे. महाराष्ट्र बोर्डाचे १६ लाखांहून अधिक विद्यार्थी दहावीच्या निकालाच्या प्रतीक्षेत आहेत. बोर्डाने उत्तरपत्रिकांच्या मूल्यांकनाची प्रक्रिया जवळपास पूर्ण केली असून काही दिवसांत निकालही जाहीर केला जाईल. हा निकाल ऑनलाइन पद्धतीने घेण्यात येईल.



Maharashtra SSC Result 2022:

महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे (Maharashtra State Board of Secondary and Higher Secondary Education, MSBSHSE) बारावीचा निकाल जाहीर झाल्यानंतर विद्यार्थ्यांना आता दहावीच्या निकालाची प्रतीक्षा आहे. महाराष्ट्र बोर्डाचा दहावीचा निकाल कधी लागणार? याबद्दल प्रश्न विचारले जात आहेत.

महाराष्ट्र बोर्डाने यापूर्वीच बारावीचा निकाल जाहीर केला आहे. दहावीची मूल्यमापन प्रक्रिया पूर्ण झाली असून शिक्षणमंत्र्यांच्या पुष्टीनंतर पुढील आठवड्यापर्यंत निकाल जाहीर होणार असल्याची माहिती मंडळाच्या अधिकाऱ्याने दिली होती. दहावीचा निकाल १५ जून रोजी जाहीर होण्याची शक्यता वर्तविली जात आहे. दरम्यान विद्यार्थ्यांनी अधिकृत माहितीसाठी मंडळाची वेबसाइट पाहण्याचा सल्ला देण्यात आला आहे. तसेच शालेय शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड लवकरच यासंदर्भात घोषणा करतील.

हे पण वाचा, HSC Result 2022: बारावीच्या विद्यार्थ्यांचे होणार रिचेकिंग, रिव्हॅल्युएशन

महाराष्ट्र बोर्डाचे १६ लाखांहून अधिक विद्यार्थी दहावीच्या निकालाच्या प्रतीक्षेत आहेत. बोर्डाने उत्तरपत्रिकांच्या मूल्यांकनाची प्रक्रिया जवळपास पूर्ण केली असून काही दिवसांत निकालही जाहीर केला जाईल. हा निकाल ऑनलाइन पद्धतीने घेण्यात येईल. महाराष्ट्र बोर्डाची दहावीची परीक्षा मार्च २०२२ मध्ये झाली. काही दिवसांपूर्वीच बोर्डाने बारावी परीक्षेचा निकाल जाहीर केला.


गेल्या वर्षीचा निकाल

परीक्षेत उत्तीर्ण होण्यासाठी विद्यार्थ्यांना किमान ३५ टक्के गुण मिळणे आवश्यक आहे. गेल्यावर्षी दहावीचा म्हणजेच महाराष्ट्र बोर्डाचा दहावीचा निकाल १६ जुलै रोजी जाहीर झाला होता. २०२१ च्या दहावी परीक्षेत साधारण १५.७४ लाख विद्यार्थ्यांनी नोंदणी केली होती. परीक्षेत एकूण ९९.९५ टक्के विद्यार्थी उत्तीर्ण झाले. यंदाही परीक्षेचा निकाल चांगला लागेल, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.



मित्रांनो अधिक महितीसाठी खालील केंद्रास भेट द्या


"शिवाज्ञा आपले सरकार सेवा केन्द्र”

दु. क्र. ४, राठी कॉम्प्लेक्स, राधाकृष्ण कॉलनी, बस स्टॅन्ड समोर, मोर्शी, जि. अमरावती

75070843439112012151

https://goo.gl/maps/6PMdqiPtvPETn4Ad8


तुम्हाला विविध शासकीय योजनांची माहिती, नोकरी अपडेट्स आपल्या मोबाईलवर हवी असेल तर खालील लिंक वरती क्लिक करुन WHATSAPP व TELEGRAM गृपला सामील व्हा...



Tuesday, June 7, 2022

बारावीच्या निकालासंदर्भात नवीन अपडेट!!

येत्या ७२ तासांत कोणत्याही क्षणी लागणार १२ वीचा निकाल

बारावीच्या परीक्षेचा निकाल बुधवारी (८ जून, दुपारी १ वाजता) लागणार आहे. दुपारी एक वाजता हा निकाल जाहीर केला जाईल. महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाकडून घेण्यात आलेल्या बारावीच्या परीक्षेचा निकाल याच आठवड्यात लागणार असल्याचं आधीच स्पष्ट करण्यात आलं होतं. ८ जून किंवा ९ जून रोजी कोणत्याही क्षणी बारावीचा निकाल लागण्याची शक्यता वर्तवण्यात आली होती. अखेर ८ जून रोजी हा निकाल लागेल, असं स्पष्ट करण्यात आलंय.


दरम्यान निकालाची सर्व प्रक्रिया पूर्ण झाली असल्याची माहिती शिक्षण मंडळाचे अध्यक्ष शरद गोसावी यांनी आधीच दिली होती. निकाल लवकरच जाहीर करण्यात येईल, असंही त्यांनी म्हटलं. राज्यातील बारावीच्या सर्व विद्यार्थी पालकांचं हे बारावीच्या निकालाच्या लक्ष लागलेलं होतं. विद्यार्थ्याची धाकधूकही वाढली होती. अखेर बुधवारी दुपारी हा निकाल जाहीर केला जाणार आहे.

यावेळचा निकाल खास यावेळचा बारावीचा निकाल जरा खास आहे. २ वर्ष कोरोना महामारी, दोन्ही वर्ष दहावी आणि बारावी दोन्हीच्या परीक्षाही ऑनलाईन आणि निकालही ऑनलाईन. यावेळी मात्र महामारी नंतर विद्यार्थ्याच्या परीक्षा ऑफलाईन घेण्यात आल्या. त्यानंतर पेपर तपासणीवर बहिष्कार सारख्या बऱ्याच अडचणींना सामोरं जात अखेर ठरलं की बारावीचा निकाल जूनच्या दुसऱ्या आठवड्यात लावायचा. त्यानुसार बुधवारी निकाल लागणार असून आता पालकांसह विद्यार्थ्याची उत्सुकता शिगेला पोहोचलीय.


विद्यार्थ्यांची लेखी परीक्षेची सवय सुटली म्हणून विद्यार्थ्यांना परीक्षेत अधिकचा वेळ देण्यात आला. दरम्यानच्या काळात कॉलेज ऑनलाईन आणि परीक्षा ऑफलाईन या कारणांमुळे तर विद्यार्थ्यांनी आंदोलनं देखील केली. पण परीक्षाही ऑफलाईन झाल्या आणि आता निकालही कोणत्याही क्षणी लागण्याची शक्यता आहे. कोरोना ही जागतिक समस्या, तिचा जर जगावर परिणाम झालाय तर विद्यार्थ्याच्या परफॉर्मन्सवर देखील होणारच. कोरोना सारख्या महामारीनंतर विद्यार्थ्यांचा निकाल, राज्यातल्या एकूणच निकालाची परिस्थिती यासाठी हा निकाल खास आहे. या सगळ्याचा मिळून परिणाम पुढच्या शिक्षणासाठीच्या प्रवेशांवर होणार आहे.


मित्रांनो अधिक महितीसाठी खालील केंद्रास भेट द्या

"शिवाज्ञा आपले सरकार सेवा केन्द्र”

दु. क्र. ४, राठी कॉम्प्लेक्स, राधाकृष्ण कॉलनी, बस स्टॅन्ड समोर, मोर्शी, जि. अमरावती

75070843439112012151

https://goo.gl/maps/6PMdqiPtvPETn4Ad8


तुम्हाला विविध शासकीय योजनांची माहिती, नोकरी अपडेट्स आपल्या मोबाईलवर हवी असेल तर खालील लिंक वरती क्लिक करुन Whatsapp व Telegram गृपला सामील व्हा...




Friday, June 3, 2022

विद्यार्थ्यांसाठी राज्य सरकारचा मोठा निर्णय, 'CET बरोबरच 12 वीचे मार्क्सही असणार IMP'

विद्यार्थ्यांसाठी राज्य सरकारचा मोठा निर्णय, 'CET बरोबरच 12 वीचे मार्क्सही असणार IMP'


    CET परीक्षेत काही महत्त्वाचे बदल राज्य शिक्षण मंडळातर्फे करण्यात आले आहेत. स्वतः उच्च शिक्षणमंत्री उदय सामंत यांनी याबद्दलची माहिती दिली आहे.


    महाराष्ट्र सामायिक प्रवेश परीक्षा MHT CET 2022 ही परीक्षा पुढे ढकलण्यात आल्याची माहिती काही दिवसांपूर्वी उच्च आणि तंत्र शिक्षणमंत्री उदय सामंत (Minister Uday Samant) यांनी ट्विट करून दिली होती. उच्च आणि तंत्रशिक्षण मंडळाकडून ही परीक्षा पुढे ढकलण्यात आली होती. मात्र  CET परीक्षेत काही महत्त्वाचे बदल राज्य शिक्षण मंडळातर्फे करण्यात आले आहेत. स्वतः उच्च शिक्षणमंत्री उदय सामंत यांनी याबद्दलची माहिती दिली आहे.

    पुढच्या वर्षीपासून सीइटीचा निकाल 1 जुलै लागेल आणि 1 सप्टेंबर पासून सत्र सुरू होईल अशा प्रकारचे नियोजन आहे अशी माहिती उच्च शिक्षणमंत्री उदय सामंत यांनी दिली आहे. तसंच ज्या विद्यार्थ्यांना आलेले गुण कमी वाटतील अशा विद्यार्थ्यांसाठी केंद्र सरकारच्या परीक्षांप्रमाणेच पुन्हा परीक्षा घेऊन अधिक गुण मिळवण्याची संधी देण्यात येईल अशीही घोषणा त्यांनी केली आहे.

    तसंच या संदर्भातील मोठा बदल म्हणजे आतापर्यंत विद्यार्थ्यांना पदवीच्या शिक्षणासाठी CET च्या मार्कांवर प्रवेश देण्यात येत होता. मात्र आता बारावीचे 50 टक्के आणि CET चे 50 टक्के अशा एकूण मार्कांवर पदवी कार्यक्रमाला प्रवेश देण्यात येणार आहे. यामुळे बारावीच्या मार्कांचं महत्वं नक्कीच वाढणार आहे असं उच्च शिक्षणमंत्र्यांनी सांगितलं आहे.

    ज्या विद्यार्थ्यांना CET परीक्षा दिल्यानंतर कोणत्याही प्रकारच्या पदवी कार्यक्रमाला प्रवेश घ्यायचा आहे. अशा सर्व विद्यार्थ्यांना आणि सीईटी द्वारे होणाऱ्या सर्व प्रकारच्या प्रवेशांना हा नियम लागू असणार आहे.

हे पण वाचा, PAN - Aadhaar Link करण्याची शेवटची तारीख वाढवली



या असतील परीक्षेच्या तारखा :

        MHT CET Exam 2022 साठी PCM ग्रुपची परीक्षा येणाऱ्या 05 ते 11 ऑगस्ट, 2022 या दरम्यान घेण्यात येणार आहे. तर PCB ग्रुपची परीक्षा ही 12 ते 20 ऑगस्ट, 2022 दरम्यान होणार आहे. महत्त्वाची गोष्ट म्हणजे 15, 16 व 17 ऑगस्ट या तारखांना कोणतेही पेपर नसणार आहेत. दरम्यान JEE , NEET आणि MHT CET या परीक्षांच्या तारखांमध्ये ओव्हरलॅपिंग होऊ नये म्हणून विद्यार्थ्यांकडून ही परीक्षा पुढे ढकलण्यात यावी अशी मागणी केली होती. त्यानुसार आता ही परीक्षा पुढे ढकलण्यात आली आहे. त्यामुळे ही परीक्षा देणाऱ्या हजारो विद्यार्थ्यांना दिलासा मिळाला आहे

मित्रांनो अधिक महितीसाठी खालील केंद्रास भेट द्या


"शिवाज्ञा आपले सरकार सेवा केन्द्र”

दु. क्र. ४, राठी कॉम्प्लेक्स, राधाकृष्ण कॉलनी, बस स्टॅन्ड समोर, मोर्शी, जि. अमरावती

75070843439112012151

https://goo.gl/maps/6PMdqiPtvPETn4Ad8


तुम्हाला विविध शासकीय योजनांची माहिती, नोकरी अपडेट्स आपल्या मोबाईलवर हवी असेल तर खालील लिंक वरती क्लिक करुन Whatsapp व Telegram गृपला सामील व्हा...




(Pavitra Portal) पवित्र पोर्टल नोंदणी 2025 करीता लागणारे कागदपत्रे | Tech Shivadnya

Documents List for Pavitra Portal Registration 2025 TAIT 2025 मार्कशीट १० वी मार्कशीट व बोर्ड सर्टीफीकेट १२ वी मार्कशीट व बोर्ड सर्टीफीकेट प...