Showing posts with label RESULT. Show all posts
Showing posts with label RESULT. Show all posts

Thursday, June 9, 2022

HSC Result 2022: बारावीच्या विद्यार्थ्यांचे होणार रिचेकिंग, रिव्हॅल्युएशन

बारावीच्या विद्यार्थ्यांचे होणार रिचेकिंग, रिव्हॅल्युएशन 


HSC Result 2022 Live Update: महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या नऊ विभागीय मंडळांमार्फत मार्च - एप्रिल २०२२ मध्ये घेण्यात आलेल्या उच्च माध्यमिक प्रमाणपत्र ( इयत्ता १२वी) परीक्षेचा निकाल जाहीर करण्यात आला आहे. बारावीची परीक्षा दिलेल्या विद्यार्थ्यांना मंडळाच्या अधिकृत वेबसाइटवर विषयनिहाय गुण उपलब्ध करण्यात आले आहेत. तसेच या निकालाची ऑनलाईन प्रत (प्रिंटआऊट) घेण्याची सुविधा उपलब्ध आहे. यासोबतच विद्यार्थ्यांना गुणपडताळणी, उत्तरपत्रिकांच्या छायाप्रती व पुनर्मूल्यांकन ही सुविधा देखील देण्यात आली आहे.


जेईई (JEE Exam) आणि नीट परीक्षा (NEET Exam) देऊ इच्छिणाऱ्या विज्ञान शाखेच्या (Science Stream) विद्यार्थ्यांच्या उत्तरपत्रिकांची (answer sheets) गुणपडताळणी, उत्तरपत्रिकांची छायाप्रत व पुनर्मूल्यांकन ( photocopy and re-evaluation of answer sheets) तातडीने आणि प्राधान्याने मिळणार आहे. यासंदर्भात सर्व विभागीय मंडळांना सूचना करण्यात आली आहे. संबंधित विद्यार्थ्यांना परीक्षेच्या प्रवेशपत्राची प्रत विषय शिक्षकांच्या अभिप्रायासोबत अपलोड करावी लागणार आहे. ऑनलाईन पध्दतीने घेण्यात येणाऱ्या माहिती तंत्रज्ञान (IT) व सामान्य ज्ञान (G.K.) या विषयांच्या उत्तरपत्रिकेचे पुनर्मूल्यांकन करून देण्यात येणार आहे. त्यासाठी देखील उपरोक्त पध्दतीने ऑनलाईन अर्ज करणे व ऑनलाईन शुल्क भरावे लागणार आहे.


गुणपडताळणी, उत्तरपत्रिकांच्या छायाप्रती आणि पुनर्मूल्यांकन

ऑनलाईन निकालानंतर गुणपडताळणी, उत्तरपत्रिकांच्या छायांकित प्रती, पुनर्मूल्यांकन यासाठी ऑनलाईन अर्ज स्विकारण्यात येणार आहे. या प्रक्रियेसाठीचे विहित शुल्क डेबिट कार्ड/ क्रेडीट कार्ड / यूपीआय / नेट बॅंकींग या माध्यमातून ऑनलाईन पध्दतीने भरावे लागणार आहे.

गुण पडताळणीसाठी अर्ज करावयाची मुदत १० जून २०२२ ते २० जून २०२२ पर्यंत दिलेल्या नमुन्यात ऑनलाईन अर्ज करणे आवश्यक राहील. गुणपडताळणीसाठी प्रति विषय रु. ५०/- इतके शुल्क ऑनलाईन पध्दतीने मंडळाकडे जमा करावे लागेल.


उत्तरपत्रिकांच्या छायाप्रती

मार्च-एप्रिल २०२२ च्या परीक्षेतील विद्यार्थ्यांना उत्तरपत्रिकांच्या छायाप्रती मागणीसाठी विद्यार्थ्यांना

  • ई-मेलद्वारे / संकेतस्थळावरुन
  • हस्तपोहोच
  • रजिस्टर पोस्टाने

यापैकी एका पर्यायाची निवड करता येईल व त्यांनी मागणी केलेल्या पध्दतीने छायाप्रती उपलब्ध करुन देण्यात येणार आहेत. यासाठी विद्यार्थ्यांनी संबंधित विभागीय मंडळाकडे शुक्रवार, दिनांक १० जून २०२२ ते २९ जून २०२२ पर्यंत विहित नमुन्यात उपरोक्त संकेतस्थळावरून ऑनलाईन पध्दतीने अर्ज करणे आवश्यक राहील. उत्तरपत्रिकेच्या छायाप्रतीसाठी प्रति विषय ४०० रुपये इतके शुल्क ऑनलाईन पध्दतीने मंडळाकडे जमा करावे लागेल.


विद्यार्थ्यांना त्यांचा निकाल व त्या अनुषंगिक येणारे प्रश्न यावर मार्गदर्शन करण्यासाठी समुपदेशक नेमण्यात आले आहेत. ही सुविधा ऑनलाईन निकालाच्या दिवसापासून पुढे आठ दिवस सुरु राहील याची विद्यार्थ्यांनी नोंद घ्या.


मित्रांनो अधिक महितीसाठी खालील केंद्रास भेट द्या

"शिवाज्ञा आपले सरकार सेवा केन्द्र”

दु. क्र. ४, राठी कॉम्प्लेक्स, राधाकृष्ण कॉलनी, बस स्टॅन्ड समोर, मोर्शी, जि. अमरावती

75070843439112012151

https://goo.gl/maps/6PMdqiPtvPETn4Ad8


तुम्हाला विविध शासकीय योजनांची माहिती, नोकरी अपडेट्स आपल्या मोबाईलवर हवी असेल तर खालील लिंक वरती क्लिक करुन WHATSAPP व TELEGRAM गृपला सामील व्हा...



Tuesday, June 7, 2022

बारावीच्या निकालासंदर्भात नवीन अपडेट!!

येत्या ७२ तासांत कोणत्याही क्षणी लागणार १२ वीचा निकाल

बारावीच्या परीक्षेचा निकाल बुधवारी (८ जून, दुपारी १ वाजता) लागणार आहे. दुपारी एक वाजता हा निकाल जाहीर केला जाईल. महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाकडून घेण्यात आलेल्या बारावीच्या परीक्षेचा निकाल याच आठवड्यात लागणार असल्याचं आधीच स्पष्ट करण्यात आलं होतं. ८ जून किंवा ९ जून रोजी कोणत्याही क्षणी बारावीचा निकाल लागण्याची शक्यता वर्तवण्यात आली होती. अखेर ८ जून रोजी हा निकाल लागेल, असं स्पष्ट करण्यात आलंय.


दरम्यान निकालाची सर्व प्रक्रिया पूर्ण झाली असल्याची माहिती शिक्षण मंडळाचे अध्यक्ष शरद गोसावी यांनी आधीच दिली होती. निकाल लवकरच जाहीर करण्यात येईल, असंही त्यांनी म्हटलं. राज्यातील बारावीच्या सर्व विद्यार्थी पालकांचं हे बारावीच्या निकालाच्या लक्ष लागलेलं होतं. विद्यार्थ्याची धाकधूकही वाढली होती. अखेर बुधवारी दुपारी हा निकाल जाहीर केला जाणार आहे.

यावेळचा निकाल खास यावेळचा बारावीचा निकाल जरा खास आहे. २ वर्ष कोरोना महामारी, दोन्ही वर्ष दहावी आणि बारावी दोन्हीच्या परीक्षाही ऑनलाईन आणि निकालही ऑनलाईन. यावेळी मात्र महामारी नंतर विद्यार्थ्याच्या परीक्षा ऑफलाईन घेण्यात आल्या. त्यानंतर पेपर तपासणीवर बहिष्कार सारख्या बऱ्याच अडचणींना सामोरं जात अखेर ठरलं की बारावीचा निकाल जूनच्या दुसऱ्या आठवड्यात लावायचा. त्यानुसार बुधवारी निकाल लागणार असून आता पालकांसह विद्यार्थ्याची उत्सुकता शिगेला पोहोचलीय.


विद्यार्थ्यांची लेखी परीक्षेची सवय सुटली म्हणून विद्यार्थ्यांना परीक्षेत अधिकचा वेळ देण्यात आला. दरम्यानच्या काळात कॉलेज ऑनलाईन आणि परीक्षा ऑफलाईन या कारणांमुळे तर विद्यार्थ्यांनी आंदोलनं देखील केली. पण परीक्षाही ऑफलाईन झाल्या आणि आता निकालही कोणत्याही क्षणी लागण्याची शक्यता आहे. कोरोना ही जागतिक समस्या, तिचा जर जगावर परिणाम झालाय तर विद्यार्थ्याच्या परफॉर्मन्सवर देखील होणारच. कोरोना सारख्या महामारीनंतर विद्यार्थ्यांचा निकाल, राज्यातल्या एकूणच निकालाची परिस्थिती यासाठी हा निकाल खास आहे. या सगळ्याचा मिळून परिणाम पुढच्या शिक्षणासाठीच्या प्रवेशांवर होणार आहे.


मित्रांनो अधिक महितीसाठी खालील केंद्रास भेट द्या

"शिवाज्ञा आपले सरकार सेवा केन्द्र”

दु. क्र. ४, राठी कॉम्प्लेक्स, राधाकृष्ण कॉलनी, बस स्टॅन्ड समोर, मोर्शी, जि. अमरावती

75070843439112012151

https://goo.gl/maps/6PMdqiPtvPETn4Ad8


तुम्हाला विविध शासकीय योजनांची माहिती, नोकरी अपडेट्स आपल्या मोबाईलवर हवी असेल तर खालील लिंक वरती क्लिक करुन Whatsapp व Telegram गृपला सामील व्हा...




Monday, June 6, 2022

MPSC मार्फत महाराष्ट्र दुय्यम सेवा अराजपत्रित गट-ब मुख्य परीक्षा २०२१

MPSC मार्फत महाराष्ट्र दुय्यम सेवा अराजपत्रित गट-ब मुख्य परीक्षा २०२१

जाहिरात क्र.:

  • ४९/२०२२ ते ५१/२०२२


परीक्षेचे नाव:

  • महाराष्ट्र दुय्यम सेवा अराजपत्रित गट-ब मुख्य परीक्षा २०२१


एकुण :

  • १०८५ जागा


पदाचे नाव & तपशील:

जाहिरात क्र.

पद क्र.

पदाचे नाव

पद संख्या 

५१/२०२२

सहाय्यक कक्ष अधिकारी (गट-ब)

१००

५०/२०२२

राज्य कर निरीक्षक (गट-ब)

६०९

४९/२०२२

पोलीस उपनिरीक्षक (गट-ब)

३७६

Total

१०८५

हे पण वाचा, JEE Mains जुलै सत्रासाठी नोंदणी प्रक्रिया सुरु..

शैक्षणिक पात्रता:

  • पदवीधर


शारीरिक पात्रता (पोलीस उपनिरीक्षक):

पुरुष

महिला

उंची- १६५ से.मी

उंची- १५७ से.मी

छाती- ७९ सेमी व फुगवून ५ सेमी जास्त


वयाची अट: [मागासवर्गीय: ०५ वर्षे सूट]

  • पद क्र.१: ०१ फेब्रुवारी २०२२ रोजी १८ ते ३८ वर्षे
  • पद क्र.२: ०१ जानेवारी २०२२ रोजी १८ ते ३८ वर्षे
  • पद क्र.३: ०१ फेब्रुवारी २०२२ रोजी १९ ते ३१ वर्षे


Fee:

  • खुला प्रवर्ग: ₹५४४/- 
  • मागासवर्गीय: ₹३४४/-


परीक्षा वेळापत्रक:

अ.क्र.

परीक्षा

दिनांक

मुख्य परीक्षा सयुक्त पेपर क्र. १

०९ जुलै २०२२

पेपर क्र. २पोलीस उपनिरीक्षक

१७ जुलै २०२२

पेपर क्र. २राज्य कर निरीक्षक

२४ जुलै २०२२

पेपर क्र. २सहाय्यक कक्ष अधिकारी

३१ जुलै २०२२

परीक्षा केंद्र:

  • अमरावती
  • औरंगाबाद
  • नागपूर
  • नाशिक
  • मुंबई
  • पुणे


Online अर्ज करण्याची शेवटची तारीख:

  • १७ जून २०२२


जाहिरात (Notification): पाहा


मित्रांनो अधिक महितीसाठी खालील केंद्रास भेट द्या

"शिवाज्ञा आपले सरकार सेवा केन्द्र”

दु. क्र. ४, राठी कॉम्प्लेक्स, राधाकृष्ण कॉलनी, बस स्टॅन्ड समोर, मोर्शी, जि. अमरावती

75070843439112012151

https://goo.gl/maps/6PMdqiPtvPETn4Ad8


तुम्हाला विविध शासकीय योजनांची माहिती, नोकरी अपडेट्स आपल्या मोबाईलवर हवी असेल तर खालील लिंक वरती क्लिक करुन Whatsapp व Telegram गृपला सामील व्हा...




(Pavitra Portal) पवित्र पोर्टल नोंदणी 2025 करीता लागणारे कागदपत्रे | Tech Shivadnya

Documents List for Pavitra Portal Registration 2025 TAIT 2025 मार्कशीट १० वी मार्कशीट व बोर्ड सर्टीफीकेट १२ वी मार्कशीट व बोर्ड सर्टीफीकेट प...