Thursday, June 9, 2022

HSC Result 2022: बारावीच्या विद्यार्थ्यांचे होणार रिचेकिंग, रिव्हॅल्युएशन

बारावीच्या विद्यार्थ्यांचे होणार रिचेकिंग, रिव्हॅल्युएशन 


HSC Result 2022 Live Update: महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या नऊ विभागीय मंडळांमार्फत मार्च - एप्रिल २०२२ मध्ये घेण्यात आलेल्या उच्च माध्यमिक प्रमाणपत्र ( इयत्ता १२वी) परीक्षेचा निकाल जाहीर करण्यात आला आहे. बारावीची परीक्षा दिलेल्या विद्यार्थ्यांना मंडळाच्या अधिकृत वेबसाइटवर विषयनिहाय गुण उपलब्ध करण्यात आले आहेत. तसेच या निकालाची ऑनलाईन प्रत (प्रिंटआऊट) घेण्याची सुविधा उपलब्ध आहे. यासोबतच विद्यार्थ्यांना गुणपडताळणी, उत्तरपत्रिकांच्या छायाप्रती व पुनर्मूल्यांकन ही सुविधा देखील देण्यात आली आहे.


जेईई (JEE Exam) आणि नीट परीक्षा (NEET Exam) देऊ इच्छिणाऱ्या विज्ञान शाखेच्या (Science Stream) विद्यार्थ्यांच्या उत्तरपत्रिकांची (answer sheets) गुणपडताळणी, उत्तरपत्रिकांची छायाप्रत व पुनर्मूल्यांकन ( photocopy and re-evaluation of answer sheets) तातडीने आणि प्राधान्याने मिळणार आहे. यासंदर्भात सर्व विभागीय मंडळांना सूचना करण्यात आली आहे. संबंधित विद्यार्थ्यांना परीक्षेच्या प्रवेशपत्राची प्रत विषय शिक्षकांच्या अभिप्रायासोबत अपलोड करावी लागणार आहे. ऑनलाईन पध्दतीने घेण्यात येणाऱ्या माहिती तंत्रज्ञान (IT) व सामान्य ज्ञान (G.K.) या विषयांच्या उत्तरपत्रिकेचे पुनर्मूल्यांकन करून देण्यात येणार आहे. त्यासाठी देखील उपरोक्त पध्दतीने ऑनलाईन अर्ज करणे व ऑनलाईन शुल्क भरावे लागणार आहे.


गुणपडताळणी, उत्तरपत्रिकांच्या छायाप्रती आणि पुनर्मूल्यांकन

ऑनलाईन निकालानंतर गुणपडताळणी, उत्तरपत्रिकांच्या छायांकित प्रती, पुनर्मूल्यांकन यासाठी ऑनलाईन अर्ज स्विकारण्यात येणार आहे. या प्रक्रियेसाठीचे विहित शुल्क डेबिट कार्ड/ क्रेडीट कार्ड / यूपीआय / नेट बॅंकींग या माध्यमातून ऑनलाईन पध्दतीने भरावे लागणार आहे.

गुण पडताळणीसाठी अर्ज करावयाची मुदत १० जून २०२२ ते २० जून २०२२ पर्यंत दिलेल्या नमुन्यात ऑनलाईन अर्ज करणे आवश्यक राहील. गुणपडताळणीसाठी प्रति विषय रु. ५०/- इतके शुल्क ऑनलाईन पध्दतीने मंडळाकडे जमा करावे लागेल.


उत्तरपत्रिकांच्या छायाप्रती

मार्च-एप्रिल २०२२ च्या परीक्षेतील विद्यार्थ्यांना उत्तरपत्रिकांच्या छायाप्रती मागणीसाठी विद्यार्थ्यांना

  • ई-मेलद्वारे / संकेतस्थळावरुन
  • हस्तपोहोच
  • रजिस्टर पोस्टाने

यापैकी एका पर्यायाची निवड करता येईल व त्यांनी मागणी केलेल्या पध्दतीने छायाप्रती उपलब्ध करुन देण्यात येणार आहेत. यासाठी विद्यार्थ्यांनी संबंधित विभागीय मंडळाकडे शुक्रवार, दिनांक १० जून २०२२ ते २९ जून २०२२ पर्यंत विहित नमुन्यात उपरोक्त संकेतस्थळावरून ऑनलाईन पध्दतीने अर्ज करणे आवश्यक राहील. उत्तरपत्रिकेच्या छायाप्रतीसाठी प्रति विषय ४०० रुपये इतके शुल्क ऑनलाईन पध्दतीने मंडळाकडे जमा करावे लागेल.


विद्यार्थ्यांना त्यांचा निकाल व त्या अनुषंगिक येणारे प्रश्न यावर मार्गदर्शन करण्यासाठी समुपदेशक नेमण्यात आले आहेत. ही सुविधा ऑनलाईन निकालाच्या दिवसापासून पुढे आठ दिवस सुरु राहील याची विद्यार्थ्यांनी नोंद घ्या.


मित्रांनो अधिक महितीसाठी खालील केंद्रास भेट द्या

"शिवाज्ञा आपले सरकार सेवा केन्द्र”

दु. क्र. ४, राठी कॉम्प्लेक्स, राधाकृष्ण कॉलनी, बस स्टॅन्ड समोर, मोर्शी, जि. अमरावती

75070843439112012151

https://goo.gl/maps/6PMdqiPtvPETn4Ad8


तुम्हाला विविध शासकीय योजनांची माहिती, नोकरी अपडेट्स आपल्या मोबाईलवर हवी असेल तर खालील लिंक वरती क्लिक करुन WHATSAPP व TELEGRAM गृपला सामील व्हा...



No comments:

Post a Comment

GMC Chhatrapati Sambhajinagar Bharti 2025: शासकीय वैद्यकीय महाविद्यालय, छत्रपती संभाजीनगर येथे भरती | Tech Shivadnya

GMC Chhatrapati Sambhajinagar Bharti 2025 जाहिरात क्र.: शावैमरुछसंन/सरळसेवा/गट-ड/2365/2025 एकूण: 357 जागा पदाचे नाव & तपशील: पद ...