Friday, June 10, 2022

SSC Result 2022: दहावीच्या निकालाची वाट पाहताय? जाणून घ्या

 SSC Result 2022: दहावीच्या निकालाची वाट पाहताय? जाणून घ्या ताजी अपडेट

राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळामार्फत बारावीचा निकाल जाहीर करण्यात आल्यानंतर आता दहावीचे विद्यार्थी निकालाची वाट पाहत आहे. महाराष्ट्र बोर्डाचे १६ लाखांहून अधिक विद्यार्थी दहावीच्या निकालाच्या प्रतीक्षेत आहेत. बोर्डाने उत्तरपत्रिकांच्या मूल्यांकनाची प्रक्रिया जवळपास पूर्ण केली असून काही दिवसांत निकालही जाहीर केला जाईल. हा निकाल ऑनलाइन पद्धतीने घेण्यात येईल.



Maharashtra SSC Result 2022:

महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे (Maharashtra State Board of Secondary and Higher Secondary Education, MSBSHSE) बारावीचा निकाल जाहीर झाल्यानंतर विद्यार्थ्यांना आता दहावीच्या निकालाची प्रतीक्षा आहे. महाराष्ट्र बोर्डाचा दहावीचा निकाल कधी लागणार? याबद्दल प्रश्न विचारले जात आहेत.

महाराष्ट्र बोर्डाने यापूर्वीच बारावीचा निकाल जाहीर केला आहे. दहावीची मूल्यमापन प्रक्रिया पूर्ण झाली असून शिक्षणमंत्र्यांच्या पुष्टीनंतर पुढील आठवड्यापर्यंत निकाल जाहीर होणार असल्याची माहिती मंडळाच्या अधिकाऱ्याने दिली होती. दहावीचा निकाल १५ जून रोजी जाहीर होण्याची शक्यता वर्तविली जात आहे. दरम्यान विद्यार्थ्यांनी अधिकृत माहितीसाठी मंडळाची वेबसाइट पाहण्याचा सल्ला देण्यात आला आहे. तसेच शालेय शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड लवकरच यासंदर्भात घोषणा करतील.

हे पण वाचा, HSC Result 2022: बारावीच्या विद्यार्थ्यांचे होणार रिचेकिंग, रिव्हॅल्युएशन

महाराष्ट्र बोर्डाचे १६ लाखांहून अधिक विद्यार्थी दहावीच्या निकालाच्या प्रतीक्षेत आहेत. बोर्डाने उत्तरपत्रिकांच्या मूल्यांकनाची प्रक्रिया जवळपास पूर्ण केली असून काही दिवसांत निकालही जाहीर केला जाईल. हा निकाल ऑनलाइन पद्धतीने घेण्यात येईल. महाराष्ट्र बोर्डाची दहावीची परीक्षा मार्च २०२२ मध्ये झाली. काही दिवसांपूर्वीच बोर्डाने बारावी परीक्षेचा निकाल जाहीर केला.


गेल्या वर्षीचा निकाल

परीक्षेत उत्तीर्ण होण्यासाठी विद्यार्थ्यांना किमान ३५ टक्के गुण मिळणे आवश्यक आहे. गेल्यावर्षी दहावीचा म्हणजेच महाराष्ट्र बोर्डाचा दहावीचा निकाल १६ जुलै रोजी जाहीर झाला होता. २०२१ च्या दहावी परीक्षेत साधारण १५.७४ लाख विद्यार्थ्यांनी नोंदणी केली होती. परीक्षेत एकूण ९९.९५ टक्के विद्यार्थी उत्तीर्ण झाले. यंदाही परीक्षेचा निकाल चांगला लागेल, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.



मित्रांनो अधिक महितीसाठी खालील केंद्रास भेट द्या


"शिवाज्ञा आपले सरकार सेवा केन्द्र”

दु. क्र. ४, राठी कॉम्प्लेक्स, राधाकृष्ण कॉलनी, बस स्टॅन्ड समोर, मोर्शी, जि. अमरावती

75070843439112012151

https://goo.gl/maps/6PMdqiPtvPETn4Ad8


तुम्हाला विविध शासकीय योजनांची माहिती, नोकरी अपडेट्स आपल्या मोबाईलवर हवी असेल तर खालील लिंक वरती क्लिक करुन WHATSAPP व TELEGRAM गृपला सामील व्हा...



No comments:

Post a Comment

GMC Chhatrapati Sambhajinagar Bharti 2025: शासकीय वैद्यकीय महाविद्यालय, छत्रपती संभाजीनगर येथे भरती | Tech Shivadnya

GMC Chhatrapati Sambhajinagar Bharti 2025 जाहिरात क्र.: शावैमरुछसंन/सरळसेवा/गट-ड/2365/2025 एकूण: 357 जागा पदाचे नाव & तपशील: पद ...