Friday, June 10, 2022

तुमचा 2000 रुपयांचा हप्ता का आला नाही? असे पाहा त्याचे कारण ..

तुमचा 2000 रुपयांचा हप्ता का आला नाही? असे पाहा त्याचे कारण ..


    जसं की आपण सर्वांना माहिती आहे देशामध्ये शेतकऱ्यांसाठी थेट आर्थिक मदत पुरवणारी एक महत्त्वपूर्ण योजना ती म्हणजे पीएम किसान योजना ( PM Kisan Yojana ) या योजनेअंतर्गत शेतकऱ्यांना नुकतेच 31 में 2022 रोजी  केंद्र शासनातर्फे ( Government of India ) या योजनेच्या हप्त्याचे वितरण शेतकऱ्यांना करण्यात आले आहे. जेणेकरून  शेतकऱ्यांना खरिपाच्या तोंडावर येणारा खर्च करण्यासाठी सरकार कडून हातभार लागू शकतो. पण बऱ्याच शेतकऱ्यांना अद्याप देखील हा  ११ वा हप्ता त्यांच्या बँक खात्यामध्ये जमा केलेला गेला नाही. त्याची अनेक कारणे असू शकतात ती आपण पाहू ... 


    यामध्ये सर्वात महत्त्वाचा मुद्दा म्हणजे ज्या शेतकऱ्यांनी अद्याप देखील पी एम किसान योजनेची केवायसी ( KYC ) प्रक्रिया पूर्ण केलेले नाही अशा देखील शेतकऱ्यांना त्यांच्या बँक खात्यामध्ये ( Bank account ) या हप्त्याची रक्कम देण्यात आलेली आहे. तर मग आपण पाहूया की लाखों शेतकऱ्यांना पात्र असून देखील त्यांच्या बँक खात्यामध्ये या योजनेची रक्कम जमा झालेली नाही. 



    या योजनेचा हप्ता जमा होण्यापूर्वी केंद्र सरकार द्वारे स्पष्ट करण्यात आले होते की यावेळी पीएम किसान योजनेच्या हप्त्यांचे वितरण हे लाभार्थ्यांच्या आधार संलग्न असणाऱ्या बँक खात्यामध्येच केले जाणार आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना त्यांचे पीएम किसान योजनेचे स्टेटस चेक करणे आवश्यक असणार आहे. स्टेटस चेक केल्यानंतर त्या ठिकाणी Payment Processed असे लिहून आल्यास तुमचा हप्ता हा लवकरच जमा केला जाईल. 


    दुसरे कारण म्हणजे त्या ठिकाणी तुमची एकापेक्षा अनेक बँकेत खाती असल्यास तुमच्या इतर कोणत्या बँक खात्यामध्ये रक्कम जमा केली गेली असली त्या बँकेचे नाव देण्यात आले आहे आणि जर तुमचे स्टेटस Rejected लिहून आल्यास तुमच्या बँक खात्यामध्ये ही रक्कम जमा केली जाणार नाही असा अर्थ होतो .


पीएम किसान (PM Kisan) या योजनेची सविस्तर माहिती,  नविण नोंदणी आणि स्टेटस चेक करण्यासाठी खालील केंद्रास भेट द्या

"शिवाज्ञा आपले सरकार सेवा केन्द्र”

दु. क्र. ४, राठी कॉम्प्लेक्स, राधाकृष्ण कॉलनी, बस स्टॅन्ड समोर, मोर्शी, जि. अमरावती

75070843439112012151

https://goo.gl/maps/6PMdqiPtvPETn4Ad8


तुम्हाला विविध शासकीय योजनांची माहिती, नोकरी अपडेट्स आपल्या मोबाईलवर हवी असेल तर खालील लिंक वरती क्लिक करुन WHATSAPP व TELEGRAM गृपला सामील व्हा...






No comments:

Post a Comment

(BMC Bharti) बृहन्मुंबई महानगरपालिकेत भरती | Tech Shivadnya

BMC Recruitment 2024 जाहिरात क्र.:  MPR/7814 एकुण:  1846 जागा पदाचे नाव:  कार्यकारी सहायक (लिपिक) शैक्षणिक पात्रता: (i) 45% गुणांसह वाणिज्य/...