Sunday, May 29, 2022

PM किसान eKYC करण्याची तारीख वाढली, ही आहे शेवटची तारीख

PM किसान eKYC करण्याची तारीख वाढली, ही आहे शेवटची तारीख


शेतकर्‍यांना निश्चित उत्पन्न मिळण्याकरीता प्रधानमंत्री किसान सन्मान निधी (PM KISAN) योजने अंतर्गत सरसकट सर्व पात्र शेतकरी कुटुंबीयास (पती, पत्नी व त्यांची १८ वर्षांखालील अपत्ये) रु. २,०००/ - प्रती हप्ता या प्रमाणे ३ हप्त्यात रु. ६,०००/ - प्रती वर्षी लाभ त्यांच्या बँक खात्यात थेट (DBT द्वारे) जमा करण्यात येत आहे.

हे पण वाचा, बियाणे अनुदानासाठी अर्ज सुरु


आज अखेर या योजने अंतर्गत राज्यातील १०९.४६ लाख लाभार्थ्यांना एकुण रक्कम रु. १८,१५१.७० कोटी लाभ अदा करण्यात आलेला आहे. या लाभार्थ्यांना द्यावयाचा लाभ सहजरत्या अदा करता यावा.

म्हणून केंद्र शासनाने प्रधानमंत्री किसान सन्मान निधी (PM KISAN) योजनेच्या लाभार्थ्यांनी त्यांचे e - KYC पडताळणी दिनांक ३१ मे, २०२२ पूर्वी पूर्ण करण्याचे निर्देश दिले होते. तथापी, सदरची e - KYC पडताळणी पुर्ण करण्यासाठी केंद्र शासनाने आता दिनांक ३१ जुलै, २०२२ पर्यंत मुदतवाढ दिलेली आहे.


PM किसान eKYC करण्याची तारीख वाढली ही आहे शेवटची तारीख

लाभार्थ्याना सामाईक सुविधा केंद्र (CSC) मार्फत e - KYC पडताळणी करण्याच्या सुविधा उपलब्ध करण्यात आल्या आहेत. या सुविधेच्या आधारे लाभार्थ्यास त्याची e - KYC पडताळणी करता येईल. 


राज्यात दिनांक २६ मे २०२२ अखेर एकूण ५२.८२ लाख लाभार्थ्याचे e - KYC पडताळणी पुर्ण करण्यात आली आहे. उर्वरीत लाभार्थ्यांनी सामाईक सुविधा केंद्र (CSC) च्या माध्यमातून त्यांचे e KYC पडताळणी केंद्र शासनाने दिलेल्या दिनांक ३१ जुलै २०२२ मुदतीपूर्वी पुर्ण करावे, असे आवाहन करण्यात येत आहे.


बायोमेट्रिक प्रमाणीकरण (eKYC) करण्यासाठी खालील केंद्रास भेट द्या..

"शिवाज्ञा आपले सरकार सेवा केन्द्र”

दु. क्र. ४, राठी कॉम्प्लेक्स, राधाकृष्ण कॉलनी, बस स्टॅन्ड समोर, मोर्शी, जि. अमरावती
75070843439112012151
https://goo.gl/maps/6PMdqiPtvPETn4Ad8


तुम्हाला विविध शासकीय योजनांची माहिती, नोकरी अपडेट्स आपल्या मोबाईलवर हवी असेल तर खालील लिंक वरती क्लिक करुन Whatsapp गृपला सामील व्हा...



WhatsApp Group Link


No comments:

Post a Comment

(BMC Bharti) बृहन्मुंबई महानगरपालिकेत भरती | Tech Shivadnya

BMC Recruitment 2024 जाहिरात क्र.:  MPR/7814 एकुण:  1846 जागा पदाचे नाव:  कार्यकारी सहायक (लिपिक) शैक्षणिक पात्रता: (i) 45% गुणांसह वाणिज्य/...