Thursday, June 2, 2022

PAN - Aadhaar Link करण्याची शेवटची तारीख वाढवली, पण 'मोफत सेवा' आता संपली !

PAN - Aadhaar Link करण्याची शेवटची तारीख वाढवली, पण 'मोफत सेवा' आता संपली !



पॅन - आधार लिंक :

नोटिफिकेशनमध्ये असे म्हटले आहे की, करदात्यांची गैरसोय कमी करण्यासाठी आधार कार्डसोबत पॅन कार्ड लिंक करण्याची मुदत 31 मार्च 2023 पर्यंत वाढवण्यात आली आहे.

जर तुम्ही अजून तुमचे पॅन कार्ड आधारशी लिंक केले नसेल, तर तुमच्यासाठी आनंदी होण्यासोबतच थोडे दु:खी होण्याचे कारण आहे. कारण, सरकारने या कामाची अंतिम तारीख ३१ मार्च २०२३ पर्यंत वाढवली आहे.


मात्र आता ही सेवा 'मोफत' मिळणार नाही. आयकर विभागासाठी (Income Tax Department) धोरण बनवणारी सर्वोच्च संस्था केंद्रीय प्रत्यक्ष कर बोर्डाने (CBDT) पॅन कार्ड - आधार कार्ड लिंक करण्याची अंतिम तारीख ३१ मार्च २०२३ पर्यंत वाढवली आहे. नोटिफिकेशनमध्ये असे म्हटले आहे की, करदात्यांची गैरसोय कमी करण्यासाठी आधार कार्डसोबत पॅन कार्ड लिंक करण्याची मुदत ३१ मार्च २०२३ पर्यंत वाढवण्यात आली आहे. दरम्यान सरकारने पॅनला आधारशी लिंक करण्याची शेवटची तारीख चौथ्यांदा वाढवली आहे.

हे पण वाचा, 'महाडीबीटी' शिष्यवृत्ती अर्जासाठी मुदतवाढ


सीबीडीटीच्या या नवीन व्यवस्थेनंतर ज्यांचे पॅन कार्ड आजपर्यंत आधारशी लिंक केलेले नाही, ते ३१ मार्च २०२३ पर्यंत कोणत्याही अडथळ्याशिवाय काम करत राहतील. अशा प्रकारे, आयकर रिटर्न भरण्यापासून ते परतावा मिळवण्यापर्यंत, ते पूर्वीप्रमाणेच वापरले जाऊ शकते.


आतापर्यंत या कामासाठी करदात्यांना कोणतेही पैसे द्यावे लागत नव्हते मात्र आता ही 'मोफत सेवा' बंद करण्यात आली आहे. अशा परिस्थितीत जर करदात्याने ०१ एप्रिल २०२२ ते ३० जून २०२२ दरम्यान पॅन आधार लिंक केले तर त्याला ५०० रुपये आणि त्यानंतर १,००० रुपये शुल्क भरावे लागेल


मित्रांनो अधिक महितीसाठी खालील केंद्रास भेट द्या


"शिवाज्ञा आपले सरकार सेवा केन्द्र”

दु. क्र. ४, राठी कॉम्प्लेक्स, राधाकृष्ण कॉलनी, बस स्टॅन्ड समोर, मोर्शी, जि. अमरावती

75070843439112012151

https://goo.gl/maps/6PMdqiPtvPETn4Ad8


तुम्हाला विविध शासकीय योजनांची माहिती, नोकरी अपडेट्स आपल्या मोबाईलवर हवी असेल तर खालील लिंक वरती क्लिक करुन Whatsapp व Telegram गृपला सामील व्हा...





No comments:

Post a Comment

GMC Chhatrapati Sambhajinagar Bharti 2025: शासकीय वैद्यकीय महाविद्यालय, छत्रपती संभाजीनगर येथे भरती | Tech Shivadnya

GMC Chhatrapati Sambhajinagar Bharti 2025 जाहिरात क्र.: शावैमरुछसंन/सरळसेवा/गट-ड/2365/2025 एकूण: 357 जागा पदाचे नाव & तपशील: पद ...