Friday, June 10, 2022

Diploma After 10th: दहावीनंतरच्या डिप्लोमाची प्रवेश प्रक्रिया सुरू

Diploma After 10th: दहावीनंतरच्या डिप्लोमाची प्रवेश प्रक्रिया सुरू

दहावीनंतरच्या (Diploma After 10th class) प्रथम वर्ष डिप्लोमा इंजिनीअरिंग (Polytechnic) प्रवेशासाठी ऑनलाइन अर्ज नोंदणी प्रक्रिया सुरू झाली असून, विद्यार्थ्यांना ३० जूनपर्यंत नोंदणी करता येणार आहे. विद्यार्थ्यांना ऑनलाइन नोंदणी करताना कागदपत्रांच्या छायांकित प्रतिही स्कॅन करून अपलोड कराव्या लागणार आहे. या प्रवेशाचे ऑनलाइन अर्ज नोंदणीचे वेळापत्रक तंत्रशिक्षण संचालनालयने (DTE) प्रसिद्ध केले आहे.


डिप्लोमा प्रवेश प्रक्रियेच्या ऑनलाइन पोर्टलचे उद्‌घाटन आणि तंत्रशिक्षण संचालनालयाच्या अद्ययावत वेबसाइटचे लोकार्पण उच्च व तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत यांच्या हस्ते झाले. याचवेळी सामंत यांनी शैक्षणिक वर्ष २०२२-२३ साठी पॉलिटेक्‍निक अभ्यासक्रमासाठी केंद्रीभूत प्रवेश प्रक्रियेला सुरुवात झाल्याचे जाहीर केले. या अभ्यासक्रमाच्या प्रवेश प्रक्रियेसाठी ऑनलाइन पोर्टल सुरू करण्यात आले आहे. त्यामुळे इयत्ता दहावी परीक्षेच्या निकालापूर्वी या पोर्टलद्वारे प्रवेश घेऊ इच्छिणाऱ्या विद्यार्थ्यांना माहिती भरून प्रक्रियेत सहभागी होता येणार आहे. ही तंत्रशिक्षण पदविका प्रवेश प्रक्रिया ऑनलाइन पद्धतीने राबविण्यात येत आहे. पॉलिटेक्‍निकला प्रवेश घेऊ इच्छिणाऱ्या विद्यार्थ्यांना दहावीच्या निकालापूर्वी अर्जात माहिती भरता येणार आहे. निकाल लागल्यानंतर त्यांना मिळालेल्या गुणांची नोंद घेऊन पुढील प्रवेश प्रक्रिया होणार आहे, असेही सामंत यांनी या वेळी सांगितले.


विद्यार्थ्यांसाठी महत्त्वाचे

विद्यार्थ्यांना वेबसाइटवरून अर्ज छाननीची योग्य पद्धत निवड करून ऑनलाइन नोंदणी करावी लागणार आहे. ३० जूनपर्यंत विद्यार्थ्यांना प्रवेशासाठी कागदपत्रांची पडताळणी आणि अर्ज भरण्याची निश्‍चिती करावी लागणार आहे. राज्य शिक्षण मंडळाच्या मार्च-एप्रिल २०२२ या वर्षात इयत्ता दहावी परीक्षा दिली आहे, त्यांनी शैक्षणिक पात्रता तपशीलामध्ये स्वत:चा आसनक्रमांक भरावा आणि शुल्क भरून अर्ज पूर्ण भरावेत.



पॉलिटेक्‍निक प्रवेशाचे वेळापत्रक

  • ऑनलाइन अर्ज नोंदणीस सुरुवात : २ जून
  • अर्ज नोंदणी करण्याची मुदत : ३० जून
  • तात्पुरती गुणवत्ता यादी प्रसिद्ध होणार : ३ जुलै
  • आक्षेप नोंदविण्यासाठी मुदत : ४ ते ६ जुलै
  • अंतिम गुणवत्ता यादी प्रसिद्ध : ७ जुलै

फी

  • महाराष्ट्र राज्यातील सर्वसाधारण प्रवर्ग आणि महाराष्ट्र राज्याबाहेरील प्रवर्ग रु. ४००/-
  • महाराष्ट्र राज्यातील राखीव प्रवर्ग उमेदवार आणि दिव्यांग उमेदवार रु. ३००/-



अधिक महितीसाठी खालील केंद्रास भेट द्या..


"शिवाज्ञा आपले सरकार सेवा केन्द्र”

दु. क्र. ४, राठी कॉम्प्लेक्स, राधाकृष्ण कॉलनी, बस स्टॅन्ड समोर, मोर्शी, जि. अमरावती

75070843439112012151

https://goo.gl/maps/6PMdqiPtvPETn4Ad8


तुम्हाला विविध शासकीय योजनांची माहिती, नोकरी अपडेट्स आपल्या मोबाईलवर हवी असेल तर खालील लिंक वरती क्लिक करुन WHATSAPP व TELEGRAM गृपला सामील व्हा...



No comments:

Post a Comment

GMC Chhatrapati Sambhajinagar Bharti 2025: शासकीय वैद्यकीय महाविद्यालय, छत्रपती संभाजीनगर येथे भरती | Tech Shivadnya

GMC Chhatrapati Sambhajinagar Bharti 2025 जाहिरात क्र.: शावैमरुछसंन/सरळसेवा/गट-ड/2365/2025 एकूण: 357 जागा पदाचे नाव & तपशील: पद ...