Friday, June 10, 2022

Diploma After 12th : बारावीनंतरच्या पदविका अभ्यासक्रमांची प्रवेश प्रक्रिया सुरू

Diploma After 12th : बारावीनंतरच्या पदविका अभ्यासक्रमांची प्रवेश प्रक्रिया सुरू


राज्यातील अनुदानित, विनाअनुदानित, खासगी महाविद्यालयांमध्ये बारावीनंतर करता येणाऱ्या (Post HSC Diploma २०२२) औषधनिर्माण शास्त्र (फार्मसी), हॉटेल मॅनेजमेंट, सरफेस कोटिंग तंत्रज्ञान या अभ्यासक्रमांची प्रवेश प्रक्रिया गुरुवार, ०९ जूनपासून सुरू झाली आहे.


प्रवेश घेण्यासाठी आवश्यक असलेल्या कागदपत्रांच्या पडताळणीसाठी विद्यार्थ्यांना ऑनलाइन आणि प्रत्यक्ष पडताळणी, असे दोन पर्याय उपलब्ध करण्यात आले आहेत. ०८ जुलैपर्यंत विद्यार्थ्यांना प्रवेशअर्ज भरून कागदपत्रे छाननीसाठी अपलोड किंवा प्रत्यक्ष सादर करता येणार आहेत.


HSC Result 2022: बारावीच्या विद्यार्थ्यांचे होणार रिचेकिंग, रिव्हॅल्युएशन


११ जुलै रोजी या सर्व अभ्यासक्रमांची अंतिम गुणवत्ता यादी जाहीर करण्यात येणार असून, त्यानंतर प्रवेश सुरू होतील, असे तंत्रशिक्षण विभागाकडून स्पष्ट करण्यात आले आहे. विद्यार्थ्यांनी प्रत्यक्ष छाननीचा पर्याय निवडल्यास स्वत: केंद्रांवर जाऊन कागदपत्रे सादर करावी लागणार आहेत. प्रवेशासाठी अर्ज मात्र ऑनलाइनच करावे लागणार असल्याचे तंत्रशिक्षण विभागाकडून स्पष्ट करण्यात आले आहे. ऑनलाइन कागदपत्रांच्या छाननीचा पर्याय निवडलेल्या विद्यार्थ्यांना सर्व कागदपत्रे अपलोड करावी लागणार आहेत.


विद्यार्थी हवेत बारावी उत्तीर्ण

डिप्लोमा इन हॉटेल मॅनेजमेंट, डिप्लोमा इन फार्मसी आणि डिप्लोमा इन सरफेस कोटिंग टेक्नॉलॉजी या तिन्ही अभ्यासक्रमांसाठी विद्यार्थी बारावी उत्तीर्ण असणे अपेक्षित आहे. या तिन्ही अभ्यासक्रमांना प्रवेश घेण्यासाठी अर्ज करण्याची मुदत ०८ जुलै आहे.


२०२२ मध्ये बारावीच्या परीक्षांना बसलेल्या विद्यार्थ्यांचे निकाल नुकतेच लागले असल्याने या परीक्षेचा आसन क्रमांक व विद्यार्थ्यांच्या बारावीच्या निकालाचा तपशील अर्जात भरून अर्ज पूर्ण करता येईल. प्रवेशअर्जांसाठी विद्यार्थ्यांना शुल्क भरण्यासाठीही ०८ जुलैपर्यंत मुदत देण्यात आली असून, ऑनलाइन पेमेंटद्वारे शुल्क भरण्याची मुभा देण्यात आली आहे.


फी

  • महाराष्ट्र राज्यातील सर्वसाधारण प्रवर्ग आणि महाराष्ट्र राज्याबाहेरील प्रवर्ग रु. ४००/-
  • महाराष्ट्र राज्यातील राखीव प्रवर्ग उमेदवार आणि दिव्यांग उमेदवार रु. ३००/-



अधिक महितीसाठी खालील केंद्रास भेट द्या..


"शिवाज्ञा आपले सरकार सेवा केन्द्र”

दु. क्र. ४, राठी कॉम्प्लेक्स, राधाकृष्ण कॉलनी, बस स्टॅन्ड समोर, मोर्शी, जि. अमरावती

75070843439112012151

https://goo.gl/maps/6PMdqiPtvPETn4Ad8


तुम्हाला विविध शासकीय योजनांची माहिती, नोकरी अपडेट्स आपल्या मोबाईलवर हवी असेल तर खालील लिंक वरती क्लिक करुन WHATSAPP व TELEGRAM गृपला सामील व्हा...



No comments:

Post a Comment

(Pavitra Portal) पवित्र पोर्टल नोंदणी 2025 करीता लागणारे कागदपत्रे | Tech Shivadnya

Documents List for Pavitra Portal Registration 2025 TAIT 2025 मार्कशीट १० वी मार्कशीट व बोर्ड सर्टीफीकेट १२ वी मार्कशीट व बोर्ड सर्टीफीकेट प...