Tuesday, June 21, 2022

ITI After 10th: आय.टी.आय. प्रवेशाची अंतिम संधी

  

ITI After 10th: आय.टी.आय. प्रवेशाची अंतिम संधी


व्यवसाय शिक्षण आणि प्रशिक्षण संचालनालयाने (DVET) औद्योगिक प्रशिक्षण संस्थेच्या (ITI) प्रवेश प्रक्रियेला सुरुवात झाली आहे. १७ जून पासून अर्ज भरणे चालू झाले असुन त्याची शेवटची तारीख २२ जुन आहे. यंदा आयटीआय प्रवेशासाठी ९७२ 'आयटीआय'मध्ये १ लाख ४९ हजार २६८ जागा प्रवेशासाठी उपलब्ध आहेत, अशी माहिती व्यवसाय शिक्षण आणि प्रशिक्षण संचालनालयाने दिली आहे.


'आय.टी.आय.' मध्ये नावीन्यपूर्ण अभ्यासक्रम

राज्यातील 'आयटीआय'मध्ये पारंपरिक शाखेच्या अभ्यासक्रमांसोबतच नावीन्यपूर्ण रोजगाराभिमुख अभ्यासक्रम सुरू करण्यात येत आहेत. गेल्या तीन वर्षांत आयटी, कम्प्युटर, एअरॉनॉटिक्स, रोबोटिक्स अशा विषयांना अनुसरून अभ्यासक्रम सुरू केले आहेत. या अभ्यासक्रमांचे शिक्षण यशस्वीपणे पूर्ण करणाऱ्या विद्यार्थ्यांना चांगल्या रोजगाराची संधी उपलब्ध होत आहेत. पारंपरिक शाखांत शिक्षण पूर्ण करणाऱ्या विद्यार्थ्यांनाही स्थानिक स्तरावर नोकरीच्या संधी उपलब्ध होतात, असे गेल्या काही वर्षांपासूनचे चित्र आहे. त्यामुळे अकरावी आणि इंजिनीअरिंग डिप्लोमा अभ्यासक्रमाला प्रवेश न घेणारे विद्यार्थी ठरवून 'आयटीआय'ला प्रवेश घेतात.

प्रवेशअर्ज शुल्क : 

  • राखीव प्रवर्ग (Reserved Category) रु. १०० 
  • अराखीव प्रवर्ग (Unreserved Category) : रु. १५०
  • महाराष्ट्र राज्याबाहेरील उमेदवार (Outside Maharashtra State) : रु. ३०० 
  • अनिवासी भारतीय उमेदवार (Non Residential Indian) : रु. ५०० 


आवश्यक सुचना :

प्रवेश अर्ज निश्चित करणे (Confirmation)

  • प्रवेश अर्ज निश्चित करण्यासाठी उमेदवाराने प्रवेश अर्जातील माहिती / दाव्यांच्या पृष्ठ्यर्थ आवश्यक मुळ दस्तऐवज / कागदपत्रे, कागदपत्रांच्या छायांकीत प्रतींचा (Photocopy) एक संच व तात्पुरत्या प्रवेश अर्जाची छापील प्रत (Print Out ) नजिकच्या औ. प्र . संस्थेत पडताळणीसाठी सादर करावेत.
  • प्रवेशासाठी आवश्यक दस्तऐवज / कागदपत्रांची यादी याच लेखामधे लागणारे कागदपत्रे यामधे उपलब्ध करुन देण्यात आली आहे.
  • अर्ज स्विकृती केंद्रामधील अधिकारी हे उमेदवाराने अर्जात नमुद केलेल्या माहितीची उमेदवाराने सादर केलेल्या मूळ दस्ताऐवजावरुन काळजीपूर्वक तपासणी करतील. आवश्यक असल्यास उमेदवारास त्यांनी भरलेली माहिती सादर केलेल्या दस्तऐवज/कागदपत्रांप्रमाणे दुरुस्त करण्याचे निर्देश देतील. तपासणीनंतर अर्जाचे निश्चितीकरण करुन उमेदवारास "अर्ज निश्चितीकरण पावती" (Application Confirmation Slip) व निश्चित केलेल्या प्रवेश अर्जाची (Confirmed Application Form) प्रत देतील.
  • अर्ज स्विकृती केंद्रामधील अधिकारी अर्ज पडताळणी व प्रवेश अर्ज निश्चित केल्यावर उमेदवारास सर्व मुळ दस्तऐवज/कागदपत्रे परत करतील.
  • उमेदवारास प्रवेश अर्ज निश्चित करण्यासाठी औ प्र . संस्थेस कोणतेही शुल्क देय नाही
  • प्रवेश अर्ज निश्चित केल्यानंतर औ. प्र. संस्था मुळ दस्तऐवज / कागदपत्रे परत करीत नसल्यास अथवा प्रवेश निश्चित करण्यासाठी शुल्क आकारत असल्यास उमेदवाराने त्वरीत मदत कक्षास संपर्क साधावा.
  • निश्चित केलेल्या प्रवेश अर्जांचाच सर्व प्रवेश फेऱ्याकरिता विचार करण्यात येईल.
  • निश्चित न केलेले अर्ज प्राप्तच झाले नाहीत असे समजण्यात येईल.
  • प्रवेश अर्ज निश्चित केल्यावर उमेदवारास प्रवेश अर्जातिल माहितीत बदल करता येणार नाही तथापि, उमेदवारास प्रवेश अर्जात सादर केलेल्या काही निवडक माहितीत कोणत्याही प्रकारे बदल करावयाचा असल्यास त्यासाठी प्राथमिक गुणवत्ता फेरी नंतर "हरकती नोंदविणे" या फेरीत आपल्या प्रवेश खात्यात प्रवेश ( Login ) करुन तसा बदल करता येईल. तद्नंतर प्रवेश अर्जात कोणत्याही प्रकारे बदल करता येणार नाही.
  • प्रवेश अर्ज निश्चित केल्यावर पहिल्या प्रवेश फेरीसाठी व्यवसाय व संस्थानिहाय विकल्प व प्राधान्य पूर्ण भरल्यानंतर Option Form ची छापील प्रत ( Print Out ) घ्यावी .


'आय.टी.आय.' प्रवेशासाठी लागणारे कागदपत्रे : येथे क्लिक करा


राज्यातील आय.टी.आय. प्रवेशाची स्थिती

आयटीआयचे प्रकार

आयटीआयची संख्या

एकूण जागा

सरकारी

४१९

९३,९०४

खासगी

५५३

५५,३६४

एकूण

९७२

,४९,२६८



आय.टी.आय. प्रवेश सुचना : येथे पाहा


अधिक महितीसाठी खालील केंद्रास भेट द्या..


"शिवाज्ञा आपले सरकार सेवा केन्द्र”

दु. क्र. ४, राठी कॉम्प्लेक्स, राधाकृष्ण कॉलनी, बस स्टॅन्ड समोर, मोर्शी, जि. अमरावती

75070843439112012151

https://goo.gl/maps/6PMdqiPtvPETn4Ad8


तुम्हाला विविध शासकीय योजनांची माहिती, नोकरी अपडेट्स आपल्या मोबाईलवर हवी असेल तर खालील लिंक वरती क्लिक करुन WHATSAPP व TELEGRAM गृपला सामील व्हा...




No comments:

Post a Comment

(BMC Bharti) बृहन्मुंबई महानगरपालिकेत भरती | Tech Shivadnya

BMC Recruitment 2024 जाहिरात क्र.:  MPR/7814 एकुण:  1846 जागा पदाचे नाव:  कार्यकारी सहायक (लिपिक) शैक्षणिक पात्रता: (i) 45% गुणांसह वाणिज्य/...