Tuesday, June 21, 2022

जेईई मुख्य परीक्षा सत्र १ चे प्रवेशपत्र जाहीर..

जेईई मुख्य परीक्षा सत्र १ चे प्रवेशपत्र जाहीर..


जेईई मुख्य २०२२ परीक्षा २३ जून ते २९ जून २०२२ या कालावधीत घेतली जाईल. देशभरातील ५०१ शहरे आणि भारताबाहेरील २२ शहरांमध्ये होणार आहेत. यापूर्वी, एनटीएने २० ते २९ जून या कालावधीत परीक्षेच्या तारखा निश्चित केल्या होत्या. दरम्यान उमेदवारांना प्रवेशपत्राची प्रतीक्षा असून यासंदर्भात महत्वाची अपडेट देण्यात आली आहे. तसेच या परीक्षेचे प्रवेशपत्र जाहीर करण्यात आले आहे.


JEE Main 2022:

नॅशनल टेस्टिंग एजन्सी (NTA) ने संयुक्त प्रवेश परीक्षा (JEE) मुख्य जून सत्रासाठी प्रवेशपत्र जाहीर केले आहे. प्रवेश परीक्षेचे पहिले सत्र २३ ते २९ जून २०२२ या कालावधीत होणार आहे. या परीक्षेचे प्रवेशपत्र  डाउनलोड करण्याची लिंक सक्रिय करण्यात आली आहे.

जेईई मेन २०२२ सत्र १ परीक्षा शहर माहिती स्लिप १६ जून २०२२ रोजी प्रसिद्ध करण्यात आली. ते डाउनलोड करण्यासाठी, उमेदवारांना अधिकृत वेबसाइटला भेट द्यावी लागेल आणि माहिती स्लिप लिंकवर क्लिक करावे लागेल. आवश्यक क्रेडेन्शियल एंटर करावे लागेल आणि त्यांची स्लिप मिळविण्यासाठी सबमिट करावे लागेल. गेल्या वर्षीचा अपवाद वगळता जेईई मेन २०२२ ची परीक्षा या वर्षी फक्त दोनदा घेतली जाईल. २०२० मध्ये देशात करोना प्रादुर्भावामुळे जेईई मेन चार सत्रांमध्ये घेण्यात आली. पूर्वी जेईई मेनमध्ये एकच सत्र असायचे. जे नंतर २०२० मध्ये दोन प्रयत्नांसाठी वाढवण्यात आले.


अधिक महितीसाठी खालील केंद्रास भेट द्या..


"शिवाज्ञा आपले सरकार सेवा केन्द्र”

दु. क्र. ४, राठी कॉम्प्लेक्स, राधाकृष्ण कॉलनी, बस स्टॅन्ड समोर, मोर्शी, जि. अमरावती

75070843439112012151

https://goo.gl/maps/6PMdqiPtvPETn4Ad8


तुम्हाला विविध शासकीय योजनांची माहिती, नोकरी अपडेट्स आपल्या मोबाईलवर हवी असेल तर खालील लिंक वरती क्लिक करुन WHATSAPP व TELEGRAM गृपला सामील व्हा...



No comments:

Post a Comment

GMC Chhatrapati Sambhajinagar Bharti 2025: शासकीय वैद्यकीय महाविद्यालय, छत्रपती संभाजीनगर येथे भरती | Tech Shivadnya

GMC Chhatrapati Sambhajinagar Bharti 2025 जाहिरात क्र.: शावैमरुछसंन/सरळसेवा/गट-ड/2365/2025 एकूण: 357 जागा पदाचे नाव & तपशील: पद ...