Monday, July 4, 2022

खरीप पीक विमा २०२२ ऑनलाईन अर्ज सुरू

खरीप पीक विमा २०२२ ऑनलाईन अर्ज सुरू


शेतकरी बांधवांना त्यांच्या पिकांना हवामान आधारित धोक्यापासून तसेच इतर धोक्यापासून संरक्षण प्रदान करण्यासाठी प्रधानमंत्री खरीप पीक विमा योजना राबविण्यात येत आहे. शेतकऱ्यांच्या खरीप पिकांना या प्रधानमंत्री खरीप पीक विमा योजना अंतर्गत सुरक्षा कवच प्रदान करण्यात येत आहे. शेतकरी बांधवांच्या पिकांचे नुकसान झाल्यास या खरीप पीक विमा अंतर्गत नुकसान भरपाई देण्यात येत असते. या पोस्ट मध्ये आपण खरीप पीक विमा योजना कसा काढायचा? या विषयी संपूर्ण माहिती जाणून घेण्याकरिता ही पोस्ट शेवट पर्यंत वाचा.



प्रधानमंत्री पीक विमा योजनेचा तपशील

एप्रिल 2016 मध्ये भारत सरकारने प्रधानमंत्री पीक विमा योजना (PMFBY) सुरू केली. त्यापूर्वी सरकारने आधीच्या इन्श्युरन्स स्कीम्स जसे की राष्ट्रीय कृषी विमा योजना (NAIS), हवामानावर आधारित पीक विमा योजना आणि सुधारित राष्ट्रीय कृषी विमा योजना (MNAIS) मागे घेतल्या. त्यामुळे, सध्याच्या घडीला भारतामध्ये ॲग्रीकल्चर इन्श्युरन्ससाठी PMFBY ही प्रमुख स्कीम आहे.


खरीप पीक विमा २०२२ अर्ज सुरू झाले आहेत. या संबंधित शासन निर्णय शासनाच्या वतीने १ जुलै २०२२ रोजी काढण्यात आलेला आहे. खरीप पीक विमा काढल्यामुळे आपण आपल्या पिकांना नैसर्गिक आपत्तीमुळे काही नुकसान झाले तर नुकसान भरपाई मिळवू शकतो. ज्या शेतकरी बांधवांना अर्ज करायचा आहे त्यांनी शेवटच्या तारखेची वाट न पाहता लवकरात लवकर विम्याकरीता नोंदणी करावयाची आहे.




खरीप पीक विमा २०२२ अर्ज कसा करायचा?

  • खरीप पीक विमा २०२२ करिता अर्ज हा ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे. याची नोंदणी ही तुम्ही CSC सेंटर तसेच आपले सरकार सेवा केंद्र येथे ऑनलाईन पद्धतीने नोंदणी करू शकता.




प्रधानमंत्री पीक विमा योजनेचे (PMFBY) लाभ

  • प्रीमियममध्ये शेतकऱ्यांचे योगदान लक्षणीयरित्या कमी करण्यात आले आहे, जसे खरीप पिकांसाठी २ %, रब्बी पिकांसाठी १.५ % आणि वार्षिक आणि व्यावसायिक पिकांसाठी ५%.
  • गारपीट, पूर आणि भूस्खलन सारख्या स्थानिक नुकसानीचे वैयक्तिकरित्या मूल्यांकन करण्याची तरतूद.
  • देशभरातील चक्रीवादळ, वादळी पाऊस आणि अवकाळी पाऊस यांमुळे सुकवण्याच्या उद्देशाने कापणीनंतर दोन आठवड्यांच्या ( १४ दिवस) कमाल कालावधीपर्यंत ‘कापलेले व विखुरलेले’ स्थितीतील शेतातील कापलेल्या पिकाचे नुकसान होते, त्या धर्तीवर वैयक्तिक प्लॉटवर पिकाच्या नुकसानीचे मूल्यांकन.
  • प्रतिबंधित पेरणी आणि स्थानिक नुकसानाच्या बाबतीत शेतकऱ्याला ऑन-अकाउंट क्लेम पेमेंट केले जाते.
  • या स्कीम अंतर्गत तंत्रज्ञानाच्या वापरासाठी मोठ्या प्रमाणात प्रोत्साहित केले जाईल. शेतकऱ्यांना होणारा क्लेम पेमेंटमधील विलंब कमी करण्यासाठी पीक कापणीचा डाटा कॅप्चर आणि अपलोड करण्यासाठी स्मार्ट फोनचा वापर केला जाईल. या स्कीम अंतर्गत पीक कापणी प्रयोगांची संख्या कमी करण्यासाठी रिमोट सेन्सिंगचा वापर केला जाईल.




खरीप पीक विमा योजना अंतिम तारीख

  • दुष्काळ, अतिवृष्टी, चक्रीवादळ असो की गारपीट. देशभरातील अनेक शेतकऱ्यांना पंतप्रधान पीक विमा योजना (PMFBY) मोठी मदत करते. त्यामुळे यंदाही या योजनेचा लाभ घ्यायचा असेल तर शेतकऱ्यांना त्याबाबत तशी नोंद करावी लागणार आहे. पंतप्रधान पीक विमा योजनेचा लाभ मिळविण्यासाठी नोंदणी करण्याची अंतिम तारीख ही ३१ जुलै आहे. त्यामुळे ज्या शेतकऱ्यांना या योजनेचा लाभ घ्यायचा आहे अशा शेतकऱ्यांनी ३१ जुलै २०२२ अखेर नोंदणी करायची आहे.



खरीप पीक विमा २०२२ मध्ये खालील पिकांचा समावेश आहे:-

तृणधान्य व कडधान्य पिके:-

  • भात (धान),खरीप ज्वारी, बाजरी,
  • नाचणी(रागी), मुग,उडीद, तुर, मका

गळीत धान्य पिके:-

  • भुईमुग, कारळे, तीळ, सूर्यफूल, सोयाबीन

नगदी पिके:-

  • कापुस, खरीप कांदा




ही योजना संपूर्ण महाराष्ट्रभर चालू आहे. या योजनेचा अचूक अर्ज करण्यासाठी शेतकरी बंधुनो तुम्ही "शिवाज्ञा आपले सरकार सेवा केन्द्र” येथे जाऊन अर्ज करू शकता.व त्या अर्जाची पोच पावती घेऊ शकता. 


अधिक महितीसाठी खालील केंद्रास भेट द्या..

"शिवाज्ञा आपले सरकार सेवा केन्द्र”

दु. क्र. ४, राठी कॉम्प्लेक्स, राधाकृष्ण कॉलनी, बस स्टॅन्ड समोर, मोर्शी, जि. अमरावती

75070843439112012151

https://goo.gl/maps/6PMdqiPtvPETn4Ad8


तुम्हाला विविध शासकीय योजनांची माहिती, नोकरी अपडेट्स आपल्या मोबाईलवर हवी असेल तर खालील लिंक वरती क्लिक करुन WHATSAPP व TELEGRAM गृपला सामील व्हा...



No comments:

Post a Comment

GMC Chhatrapati Sambhajinagar Bharti 2025: शासकीय वैद्यकीय महाविद्यालय, छत्रपती संभाजीनगर येथे भरती | Tech Shivadnya

GMC Chhatrapati Sambhajinagar Bharti 2025 जाहिरात क्र.: शावैमरुछसंन/सरळसेवा/गट-ड/2365/2025 एकूण: 357 जागा पदाचे नाव & तपशील: पद ...