Wednesday, March 1, 2023

(RTE 25%) आर.टी.ई. २५ टक्के २०२३-२४ प्रवेश प्रक्रिया सुरु | Tech Shivadnya

RTE Admissions 2023-24

बालकांचा मोफत व सक्तीच्या शिक्षणाचाअधिकार अधिनियम २००९ (RTE Act 2009) शिक्षण हक्क कायद्यानुसार महाराष्ट्र राज्यातील विशेषतः खाजगी शाळांमध्ये आर्थिक दुर्बल घटकांसाठी RTE अंतर्गत २५ टक्के प्रवेश प्रक्रिया राबविण्यात येते. यामध्ये नविन प्रवेशित मुलांसाठी २५ टक्के जागा या राखीव असतात. दरवर्षी पालकांना ऑनलाइन पद्धतीने अर्ज करून, आर.टी.ई. de प्रक्रिया लॉटरी पद्धतीने राबवली जाते.


आर.टी.ई. २५ टक्के २०२३-२४ करीता आवश्यक कागदपत्रे :

(RTE Admission Documents List) :

  • रहिवाशी प्रमाणपत्र (वास्तव्याचा पुरावा)
  • जन्म दाखला
  • आर्थिक दृष्ट्या दुर्बल असल्यास उत्पन्नाचा दाखला (एक लाखापेक्षा कमी उत्पन्न)
  • जातीचा दाखला - वंचित जात सवर्गातील असल्यास वडिलांचे व बालकाचे जात प्रमाणपत्र
  • दिव्यांग असल्यास – जिल्हा शल्यचिकित्सक यांचे किमान ४०% चे दिव्यांग प्रमाणपत्र
  • एकल पालकत्व असल्यास आई किंवा वडील यांचे कागदपत्रे
  • घटस्फोटित महिला असल्यास संबंधित कागदपत्रे
  • न्याय प्रविष्ट असलेल्या घटस्फोटाप्रकरणातील महिला असल्यास संबंधित कागदपत्रे
  • विधवा महिला असल्यास संबंधित कागदपत्रे
  • HIV बाधित/प्रभावित असल्यास संबंधित कागदपत्रे
  • अनाथ बालके असल्यास आवश्यक कागदपत्रे


  • महत्वाचे - आर.टी.ई. 25 टक्के २०२३-२४ प्रवेश प्रक्रियेसाठी ऑनलाइन प्रवेशाकरिता लागणारी आवश्यक सर्व कागदपत्रे ही ऑनलाइन प्रवेश अर्ज भरण्याच्या अंतिम तारखे पर्यंतची असावीत. त्यानंतरचे कागदपत्रे स्वीकारली जाणार नाही याची काळजी घ्या.



आर.टी.ई. 25 टक्के २०२३-२४ प्रवेशासाठी मुलाचे वय मर्यादा
(RTE Admission 2023-24 age Limit)

अ. क्र.

प्रवेशाचा वर्ग

वयोमर्यादा

३१ डिसेंबर २०२३ रोजी वय

प्लेग्रुप/नर्सरी,

१ जुलै २०१९ – ३१ डिसेंबर २०२०

४ वर्ष ५ महिने ३० दिवस

ज्युनियर केजी,

१ जुलै २०१८ – ३१ डिसेंबर २०१९

५ वर्ष ५ महिने ३० दिवस

सिनियर केजी

१ जुलै २०१७ – ३१ डिसेंबर २०१८

६ वर्ष ५ महिने ३० दिवस

इयत्ता१

१ जुलै २०१६ – ३१ डिसेंबर २०१७

७ वर्ष ५ महिने ३० दिवस



Age Rule GR : PDF




अधिक महितीसाठी खालील केंद्रास भेट द्या..

"शिवाज्ञा आपले सरकार सेवा केन्द्र”

दु. क्र. ४, राठी कॉम्प्लेक्स, राधाकृष्ण कॉलनी, बस स्टॅन्ड समोर, मोर्शी, जि. अमरावती


तुम्हाला विविध शासकीय योजनांची माहिती, नोकरी अपडेट्स आपल्या मोबाईलवर हवी असेल तर खालील लिंक वरती क्लिक करुन WHATSAPP व TELEGRAM गृपला सामील व्हा...




No comments:

Post a Comment

(BMC Bharti) बृहन्मुंबई महानगरपालिकेत भरती | Tech Shivadnya

BMC Recruitment 2024 जाहिरात क्र.:  MPR/7814 एकुण:  1846 जागा पदाचे नाव:  कार्यकारी सहायक (लिपिक) शैक्षणिक पात्रता: (i) 45% गुणांसह वाणिज्य/...