Saturday, June 18, 2022

ITI After 10th: आय.टी.आय. प्रवेश प्रक्रिया सुरु

 

ITI After 10th: आय.टी.आय. प्रवेश प्रक्रिया सुरु


व्यवसाय शिक्षण आणि प्रशिक्षण संचालनालयाने (DVET) औद्योगिक प्रशिक्षण संस्थेच्या (ITI) प्रवेश प्रक्रियेला सुरुवात झाली आहे. १७ जून पासून अर्ज भरता येणार आहेत. यंदा आयटीआय प्रवेशासाठी ९७२ 'आयटीआय'मध्ये एक लाख ४९ हजार २६८ जागा प्रवेशासाठी उपलब्ध आहेत, अशी माहिती व्यवसाय शिक्षण आणि प्रशिक्षण संचालनालयाने दिली आहे.


दहावीचा निकाल (SSC Result 2022) १६ जून रोजी जाहीर होणार आहे. त्यामुळे अकरावी आणि इंजिनीअरिंग डिप्लोमा अभ्यासक्रमाला प्रवेश न घेणारे विद्यार्थी प्रामुख्याने आयटीआय प्रवेशाकडे वळतात. या पार्श्वभूमीवर अनेक विद्यार्थी आयटीआय प्रवेशाची वाट पाहत असतात. त्या दृष्टीने 'डीव्हीईटी'ने ऑनलाइन प्रवेशप्रक्रियेची तयारी पूर्ण केली आहे. यंदा 'आयटीआय'च्या प्रवेशासाठी राज्यभरात एक लाख ४९ हजार २६८ जागा उपलब्ध राहणार आहेत. गेल्या वर्षीच्या तुलनेत काही प्रमाणात जागा कमी झाल्या आहेत. विद्यार्थ्यांना अर्ज करण्यासाठी साधारण एक महिन्याची मुदत राहणार आहे. परवानगी मिळाल्यास ही मुदत वाढण्याची शक्यता आहे.


'आय.टी.आय.' प्रवेशासाठी लागणारे कागदपत्रे :

  • आधार कार्ड
  • ८ वी मार्कशीट
  • ० वी मार्कशीट


'आय.टी.आय.' मध्ये नावीन्यपूर्ण अभ्यासक्रम

राज्यातील 'आयटीआय'मध्ये पारंपरिक शाखेच्या अभ्यासक्रमांसोबतच नावीन्यपूर्ण रोजगाराभिमुख अभ्यासक्रम सुरू करण्यात येत आहेत. गेल्या तीन वर्षांत आयटी, कम्प्युटर, एअरॉनॉटिक्स, रोबोटिक्स अशा विषयांना अनुसरून अभ्यासक्रम सुरू केले आहेत. या अभ्यासक्रमांचे शिक्षण यशस्वीपणे पूर्ण करणाऱ्या विद्यार्थ्यांना चांगल्या रोजगाराची संधी उपलब्ध होत आहेत. पारंपरिक शाखांत शिक्षण पूर्ण करणाऱ्या विद्यार्थ्यांनाही स्थानिक स्तरावर नोकरीच्या संधी उपलब्ध होतात, असे गेल्या काही वर्षांपासूनचे चित्र आहे. त्यामुळे अकरावी आणि इंजिनीअरिंग डिप्लोमा अभ्यासक्रमाला प्रवेश न घेणारे विद्यार्थी ठरवून 'आयटीआय'ला प्रवेश घेतात.


राज्यातील आय.टी.आय. प्रवेशाची स्थिती

आयटीआयचे प्रकार

आयटीआयची संख्या

एकूण जागा

सरकारी

४१९

९३,९०४

खासगी

५५३

५५,३६४

एकूण

९७२

,४९,२६८



आय.टी.आय. प्रवेश सुचना : येथे पाहा


अधिक महितीसाठी खालील केंद्रास भेट द्या..


"शिवाज्ञा आपले सरकार सेवा केन्द्र”

दु. क्र. ४, राठी कॉम्प्लेक्स, राधाकृष्ण कॉलनी, बस स्टॅन्ड समोर, मोर्शी, जि. अमरावती

75070843439112012151

https://goo.gl/maps/6PMdqiPtvPETn4Ad8


तुम्हाला विविध शासकीय योजनांची माहिती, नोकरी अपडेट्स आपल्या मोबाईलवर हवी असेल तर खालील लिंक वरती क्लिक करुन WHATSAPP व TELEGRAM गृपला सामील व्हा...




No comments:

Post a Comment

(BMC Bharti) बृहन्मुंबई महानगरपालिकेत भरती | Tech Shivadnya

BMC Recruitment 2024 जाहिरात क्र.:  MPR/7814 एकुण:  1846 जागा पदाचे नाव:  कार्यकारी सहायक (लिपिक) शैक्षणिक पात्रता: (i) 45% गुणांसह वाणिज्य/...