Friday, July 1, 2022

लष्करात आजपासून मिशन 'अग्निपथ' अग्निवीरभरतीसाठी ऑनलाईन नोंदणी

Indian Army Agniveer Recruitment :


Indian Army Agniveer:

भारतीय लष्कारात अग्निवीरांसाठी करिअर घडविण्याची अभूतपूर्व योजना आजपासून तरुणांसाठी उपलब्ध होत आहे. यापूर्वी वायुदलात (Indian Air Force) अग्निवीरांसाठी (Agniveer) भरती प्रक्रियेतील (Recruitment Process) पहिला टप्पा झाला. आता दुसर्‍या टप्प्यात लष्करात पदभरतीची संधी उपलब्ध झाली आहे. लष्करात साहस, हिंमत आणि जमिनीवरील युद्धात दुष्मानाला थेट भिडण्याचे कौशल्य तरुणांच्या अंगी भिनेल. हे तरुण चार वर्षानंतर कुठल्याही क्षेत्रात कोणत्याही आव्हानांशी दोन हात करायला तयार होतील. चार वर्षांच्या परिश्रमात अग्निवीरांना खडतर प्रशिक्षण, कौशल्यासह चांगल्या वेतनाची (Salary) संधी खुणावत आहे. 


अवघ्या 23, 24 वर्षी तयार होऊन बाहेर पडणार्‍या तरुणांना दांडगा अनुभव तर असेलच पण त्यांच्या गाठी जमापुंजीपण असेल. त्या जोरावर ते नवीन करियर घडवू शकतात. त्यांचा जॉब प्रोफाईल (Job Profile) कमी वयातच जबरदस्त असल्याने अनेक कंपन्यांची दार त्यांच्यासाठी उघडणार आहेत. एवढंच नाहीतर त्यांना पुढचे शिक्षण घेऊन आणखी उंच भरारी घेता येणार आहे. अथवा त्यांचा व्यवसाय सुरु करता येणार आहे. लष्कारातील अग्निवीर भरतीसाठी ऑनलाईन नोंदणीला (Online Registration) आजपासून 1 जुलैपासून सुरुवात होत आहे. नोंदणीनंतर उमेदवारांची लेखी परीक्षा घेण्यात येईल. निवड झालेल्या पात्र उमेदवारांचे डिसेंबरच्या अखेरीस म्हणजे या वर्षाच्या शेवटी प्रशिक्षण सुरु होईल.


असा करा अर्ज 

अग्निवीर लष्करात भरतीसाठी ऑनलाईन रजिस्ट्रेशन करणे अनिवार्य आहे. अर्ज करण्यासाठी तरुणांना संकेतस्थळावर वर जाऊन अर्ज भरुन संपूर्ण प्रक्रिया पूर्ण करावी लागेल. उमेदवार यामध्ये त्यांची इत्यंभूत माहिती सविस्तर भरुन रजिस्ट्रेशन्स पूर्ण करतील. ऑनलाईन अर्ज भरुन तो जमा करावा लागेल. सोबतच उमेदवारांना प्रक्रिया शुल्क जमा करावे लागेल. 16 ऑक्टोबर रोजी उमेदवारांची लेखी परीक्षा घेण्यात येणार आहे. तर 30 डिसेंबर 2022 पासून लष्कराच्या प्रशिक्षणाला सुरुवात होईल.


पदाचे नाव & तपशील:

पद क्र.

पदाचे नाव

1

अग्निवीर (जनरल ड्यूटी) (GD)

2

अग्निवीर (टेक्निकल) 

3

सोल्जर टेक्निकल (एव्हिएशनदारुगोळा निरीक्षक)

4

अग्निवीर लिपिक/स्टोअर कीपर टेक्निकल

5

अग्निवीर ट्रेड्समन (10 वी उत्तीर्ण)

6

अग्निवीर ट्रेड्समन (08 वी उत्तीर्ण)


शैक्षणिक पात्रता:

  • पद क्र.1: 45% गुणांसह 10वी उत्तीर्ण.
  • पद क्र.2: 50% गुणांसह 12वी उत्तीर्ण (PCB & इंग्रजी). किंवा 12वी उत्तीर्ण+ITI किंवा डिप्लोमा.
  • पद क्र.3: 50% गुणांसह 12वी उत्तीर्ण (PCM & इंग्रजी).
  • पद क्र.4: 60% गुणांसह 12वी उत्तीर्ण (कला, वाणिज्य, विज्ञान).
  • पद क्र.5: 10वी उत्तीर्ण.पद क्र.6: 08वी उत्तीर्ण.


वयाची अट:

  • 01 ऑक्टोबर 2022 रोजी 17.5 ते 23 वर्षे.

नोकरी ठिकाण: 

  • संपूर्ण भारत.

Online अर्ज सुरुवात: 

  • 01 जुलै 2022


जाहिरात (Notification): पाहा




अधिक महितीसाठी खालील केंद्रास भेट द्या..

"शिवाज्ञा आपले सरकार सेवा केन्द्र”

दु. क्र. ४, राठी कॉम्प्लेक्स, राधाकृष्ण कॉलनी, बस स्टॅन्ड समोर, मोर्शी, जि. अमरावती


तुम्हाला विविध शासकीय योजनांची माहिती, नोकरी अपडेट्स आपल्या मोबाईलवर हवी असेल तर खालील लिंक वरती क्लिक करुन WHATSAPP व TELEGRAM गृपला सामील व्हा...




No comments:

Post a Comment

GMC Chhatrapati Sambhajinagar Bharti 2025: शासकीय वैद्यकीय महाविद्यालय, छत्रपती संभाजीनगर येथे भरती | Tech Shivadnya

GMC Chhatrapati Sambhajinagar Bharti 2025 जाहिरात क्र.: शावैमरुछसंन/सरळसेवा/गट-ड/2365/2025 एकूण: 357 जागा पदाचे नाव & तपशील: पद ...