Wednesday, June 8, 2022

ई-श्रम कार्ड म्हणजे काय ? कोण असणार पात्र ? नेमक्या कोणत्या सुविधा मिळणार, जाणून घ्या !

ई-श्रम कार्ड म्हणजे काय ? कोण असणार पात्र ? नेमक्या कोणत्या सुविधा मिळणार, जाणून घ्या !

सरकारने असंघटित कामगारांच्या सुरक्षेसाठी आणि शासकीय अनुदान देताना येणाऱ्या अडचणी यासाठी या कामगारांची नोंदणी करण्याचे ठरविले आहे.

ई - श्रम कार्ड देशभरात स्वीकारार्ह असेल. नोंदणीनंतर कामगारांना अपघात विम्याची सुविधा प्राप्त होईल. पंतप्रधान सुरक्षा विमा योजनेच्या अंतर्गत तात्पुरता अपंगत्व आल्यास १ लाख रुपये तर कायमस्वरूपी अपंगत्व आल्यास दोन लाख रुपयांचे विमाकवच लाभणार आहे. त्यातच भविष्यात असंघटित कामगारांना सर्व प्रकारच्या सामाजिक सुरक्षा लाभही मिळणार आहेत .

असंघटित कामगार म्हणजे कोण आहेत?

  • लहान आणि सीमांत शेतकरी / शेतमजूर
  • पशुपालन करणारे
  • विडी कामगार
  • बांधकाम कामगार
  • सेंट्रिंग कामगार
  • लेदर कामगार
  • सुतार
  • वीटभट्टीवर काम करणारे
  • न्हावी
  • घरगुती कामगार
  • भाजीपाला विक्रेते
  • फळ विक्रेते
  • वृत्तपत्र विक्रेते
  • हातगाडी ओढणारे
  • ऑटो रिक्षा चालक
  • घरकाम करणारे कामगार
  • आशा कामगार
  • दूध उत्पादक शेतकरी
  • सामान्य सेवा केंद्रचालक
  • स्थलांतरित कामगार
  • अन्य सर्व कामगार .........

यासारखे असे अनेक लोक आहेत त्यांची शासनाकडे नोंद नाही. त्यामुळे आपत्ती आली असता. किंवा काही नुकसान झाले असता त्यांच्यासाठी शासन काहीही करू शकत नाही म्हणून शासन या नोंदणीच्या माध्यमातून अशा लोकांना एक UAN (एक विशिष्ट नंबर ) देणार आहे. आणि त्याचे इ श्रम (E SHRAM ) कार्ड (आधार कार्ड सारखे कार्ड ) देणार आहे ज्यामुळे त्या लोकांना एक ओळख मिळणार असून शासनाचे अनेक लाभ मिळण्यास सोपे होणार आहे.

ई-श्रम नोंदणी साठी निकष 

  • ती व्यक्ती १६ ते ५९ वय असणारी असावी
  • ती व्यक्ती इनकम टॅक्स भरणारी नसावी
  • ती व्यक्ती EPFO व ESIC ची सदस्य नसावी
  • वरील कामगार श्रेत्रात काम करणारी असावी

ई-श्रम नोंदणी साठी लागणारी कागदपत्रे

  • आधार कार्ड
  • मोबाइल नंबर
  • बँक पासबुक


ई - श्रम कार्ड या योजनेची सविस्तर माहिती, महालाभार्थी योजना ऑनलाईन फॉर्म भरण्यासाठी खालील केंद्रास भेट द्या

"शिवाज्ञा आपले सरकार सेवा केन्द्र”

दु. क्र. ४, राठी कॉम्प्लेक्स, राधाकृष्ण कॉलनी, बस स्टॅन्ड समोर, मोर्शी, जि. अमरावती

75070843439112012151

https://goo.gl/maps/6PMdqiPtvPETn4Ad8


तुम्हाला विविध शासकीय योजनांची माहिती, नोकरी अपडेट्स आपल्या मोबाईलवर हवी असेल तर खालील लिंक वरती क्लिक करुन Whatsapp व Telegram गृपला सामील व्हा...







No comments:

Post a Comment

GMC Chhatrapati Sambhajinagar Bharti 2025: शासकीय वैद्यकीय महाविद्यालय, छत्रपती संभाजीनगर येथे भरती | Tech Shivadnya

GMC Chhatrapati Sambhajinagar Bharti 2025 जाहिरात क्र.: शावैमरुछसंन/सरळसेवा/गट-ड/2365/2025 एकूण: 357 जागा पदाचे नाव & तपशील: पद ...