Friday, May 20, 2022

बियाणे अनुदान योजना 2022 | Tech Shivadnya

 बियाणे अनुदान योजना २०२२

बियाणे अनुदानासाठी अर्ज सुरु.

नमस्कार शेतकरी बंधूंनो, आता पेरणीचे दिवस जवळ आले आहेत. तुम्ही जर शेतकरी असालं आणि तुम्हाला शासकीय अनुदानावर बियाणे हवे असेल, तर लगेच ऑनलाईन अर्ज करून घ्या. कारण बियाणे अनुदान योजना २०२२ ऑनलाईन अर्ज प्रक्रिया सुरु झालेली आहे. तरी या योजनेचा भरपूर शेतकर्‍यांनी फायदा घ्यावा. 


यामध्ये आपण सोयाबीन, मका , तुर, मुग, उडीद, खरीप ज्वारी या बियाणे साठी अर्ज करू शकता. सदरील योजनेत अर्ज करणाऱ्या शेतकऱ्याची निवड ही प्राप्त अर्जा मधून लॉटरी पद्धतीने करण्यात येईल. लॉटरी पद्धतीमध्ये ज्या शेतकरी बंधूंची निवड होईल त्यांनाच अनुदानावर बियाणे मिळेल. ज्या पिकाच्या बियाण्यासाठी अर्ज केला आहे, त्याच पिकाचे बियाणे व वाण उपलब्धतेनुसार मिळेल. खाली सविस्तर वाचा…



आवश्यक कागदपत्रे :

१) ८अ उतारा
२) ७/१२ उतारा
३) आधार कार्ड
४) बॅंक खाते

 

शेतकरी बांधवांनी बियाणे घटकासाठी अर्ज करताना चालू मोबाईल क्रमांक ऑनलाइन अर्ज मध्ये नोंदवावा. निवड झाल्याचा संदेश मोबाईलवर प्राप्त होईल.. 

  • आपणास कमाल २ हेक्टर क्षेत्र मर्यादेपर्यंत लाभ देण्यात येईल.
  • पिक प्रात्यक्षिकाकरिता बियाण्यास १००% अनुदान दिले जाईल.
  • प्रमाणित बियाण्याकरिता कमाल ५०% मर्यादेपर्यंत अनुदान दिले जाईल.


बियाणे अनुदान योजना 2022

योजनेचे  नाव  Biyane Anudan Yojana
योजनेचे कार्यक्षेत्रसंपुर्ण महाराष्ट्र राज्य
जारी करणारा विभागकृषी विभाग,महाराष्ट्र शासन
लाभ बियाणे
लाभार्थीशेतकरी असणे आवश्यक
अर्ज फॉर्म ऑनलाईन


शेतीसाठी लागणाऱ्या बियाण्यांच्या व खतांच्या किमतीमध्ये भरमसाठ वाढ झालेली आहे. दिवसेंदिवस महागाई वाढत चाललेली आहे. अशावेळी जर तुम्ही शासकीय अनुदानावर बियाणे खरेदी केले तर नक्कीच तुमच्या खर्चाची बचत होऊ शकते.


बियाणे अनुदान योजना अर्ज कोठे व कसा करायचा :


ही योजना संपूर्ण महाराष्ट्रभर चालू आहे. या योजनेचा अचूक अर्ज करण्यासाठी शेतकरी बंधुनो तुम्ही "शिवाज्ञा आपले सरकार सेवा केन्द्र” येथे जाऊन अर्ज करू शकता.व त्या अर्जाची पोच पावती घेऊ शकता. काही शंका असल्यास तुमच्या तालुक्याच्या कृषी अधिकारी साहेबांसोबत चर्चा करा.


मित्रांनो अधिक महितीसाठी खालील केंद्रास भेट द्या

"शिवाज्ञा आपले सरकार सेवा केन्द्र”

दु. क्र. ४, राठी कॉम्प्लेक्स, राधाकृष्ण कॉलनी, बस स्टॅन्ड समोर, मोर्शी, जि. अमरावती

7507084343, 9112012151

https://goo.gl/maps/6PMdqiPtvPETn4Ad8


शेतकरी बंधूंनो शासन हे अशाप्रकारे खूप योजना आपल्या शेतकरी मित्रांसाठी काढत असते. तरी काहीच शेतकरी या योजनांचा लाभ घेतात कारण बर्‍याच शेतकरी बांधवांना माहीतच नसतं. कोणती योजना आली, कोणती योजना सध्या चालू आहे आणि कधी कधी कळते ते वेळ, तारीख संपल्यानंतर. तुम्हाला विविध शासकीय योजनांची माहिती आपल्या मोबाईलवर हवी असेल तर खालील लिंक वरती क्लिक करुन Whatsapp गृपला सामील व्हा

(ज्यांनी ग्रुप जॉईन नाही केला फक्त  त्यांंच्यासाठी)

WhatsApp Group Link




No comments:

Post a Comment

GMC Chhatrapati Sambhajinagar Bharti 2025: शासकीय वैद्यकीय महाविद्यालय, छत्रपती संभाजीनगर येथे भरती | Tech Shivadnya

GMC Chhatrapati Sambhajinagar Bharti 2025 जाहिरात क्र.: शावैमरुछसंन/सरळसेवा/गट-ड/2365/2025 एकूण: 357 जागा पदाचे नाव & तपशील: पद ...