Tuesday, May 31, 2022

फळपीक विमा २०२२ नोंदणीला सुरुवात !

फळपिक विमा २०२२ नोंदणीला सुरुवात

 

फळपिक विमा योजना २०२२:

राज्यात आंबिया बहारासाठी फळ पीकविमा योजनेत सहभाग घेण्याकरिता शेतकऱ्यांकडून नोंदणी अर्ज स्वीकारण्यास सुरुवात झाली आहे. कृषि क्षेत्राच्या उत्पादन वाढीच्या दरामध्ये फळ पिकांचा प्रमुख सहभाग आहे. फळ पिकांचे बाजारमुल्य अधिक असल्याने शेतकऱ्यांना चांगले उत्पन्न मिळते.

येथे क्लिक करा



मात्र फळ पिकाचे अपेक्षित उत्पन्न न आल्यास येणारा तोटाही मोठा असतो. ही बाब विचारात घेऊन शेतकऱ्यांच्या फळ पिकांना हवामान धोक्यांपासुन विमा संरक्षण दिल्यास शेतकऱ्यांचे आर्थिक स्थैर्य अबाधित राखण्याच्या दृष्टीने मदत होईल.

त्यासाठी राज्यात प्राधान्याने सदरची योजना राबविण्यात येत आहे. विविध हवामान धोक्यांमुळे फळ पिकाच्या उत्पादकतेवर विपरीत परीणाम होऊन मोठ्या प्रमाणावर उत्पादनामध्ये घट येते पर्यायाने शेतकऱ्यांना अपेक्षित उत्पादन न मिळाल्याने आर्थिक संकटाला तोंड द्यावे लागते.

या सर्व बाबींचा विचार करुन शेतकऱ्यांना फळपीक नुकसान भरपाई मिळण्यासाठी एक उपाय म्हणून पुनर्रचित हवामान आधारीत पीक विमा योजना राबविणे शासनाच्या विचाराधीन होते.


फळपीक विमा योजना २०२२

पुनर्रचित हवामान, अवकाळी पाऊस, जादा तापमान, अति पाऊस किंवा गारपिट पासून फळ पिकांना विमा संरक्षण मिळवण्याची सुविधा या योजनेत आहे. आंबिया बहाराच्या विमा योजनेत डाळिंब, संत्रा, मोसंबी, काजू, केळी, द्राक्ष, आंबा, पपई व स्ट्रॉबेरी ही पिके असतील. 

राज्याचे मुख्य सांख्यिक विनयकुमार आवटे यांनी दिलेल्या माहिती नुसार, अधिसूचित क्षेत्र व अधिसूचित फळांची माहिती घेण्यासाठी शेतकऱ्यांनी आपापल्या तालुका कृषी अधिकारी कार्यालयास भेट द्यावी. एक शेतकरी एकापेक्षा जास्त फळबागांसाठी देखील या योजनेत भाग घेऊ शकतात. मात्र त्या फळासाठी संबंधित मंडळ अधिसूचित आहे की नाही याची खात्री शेतकऱ्यांना करावी लागेल.

एक शेतकरी चार हेक्टरच्या मर्यादिपर्यंत विमा संरक्षण मिळूवू शकतो. विमा संरक्षित रकमेच्या पाच टक्क्यांच्या मर्यादिपर्यंत शेतकऱ्यांसाठी विमा हप्ता ठेवला जातो. त्यापेक्षा जास्त हप्ता असल्यास केंद्र व राज्याकडून अनुदान दिले जाते. मात्र, असा हप्ता ३५ टक्क्यांपेक्षा जास्त असल्यास शेतकऱ्याला पाच टक्क्यांपेक्षा जादा विमा हप्ता भरावा लागणार आहे.


आवश्यक कागदपत्रे व नोंदणी कशी करावी

बिगर कर्जदारांना सहभाग घ्यायचा असल्यास ही कागदपत्रे गोळा करावी.

  • आधार ओळखपत्र
  • सातबारा
  • आठ अ उतारा
  • पीक लागवडीचे स्वयंघोषणापत्र
  • फळबागेचा टॅगिंग चिन्हांकित केलेले छायाचित्र
  • बँकेचे खातेपुस्तक

अशी कागदपत्रे व माहिती गोळा करावी.

फळबागेचा टॅगिंग चिन्हांकित केलेले छायाचित्र काढण्यासाठी खालील अप्लीकेशनचा उपयोग करावा. 


फळपीक विमा योजना उद्देश

साधारपणे फळपीक विमा योजनेचे उद्देश आहे.

  • नैसर्गिक आपत्ती व हवामानातील प्रतिकूल परिस्थिती मुळे फळ पिकांचे नुकसान झाल्यास शेतकऱ्यांना विमा संरक्षण देणे.
  • पिकांच्या नुकसानीच्या अत्यंत कठीण परिस्थितीतही शेतकऱ्यांचे आर्थिक स्थैर्य अबाधित राखणे.
  • शेतकऱ्यांना नाविन्यपूर्ण व सुधारीत मशागतीचे तंत्रज्ञान व सामुग्री वापरण्यास प्रोत्साहन देणे.
  • कृषि क्षेत्रासाठीच्या पत पुरवठ्यात सातत्य राखणे, जेणेकरून उत्पादनातील जोखमींपासून शेतकऱ्यांच्या संरक्षणावरोबरच अन्नसुरक्षा, पिकांचे विविधीकरण आणि कृषि क्षेत्राचा गतिमान विकास व स्पर्धात्मकतेत वाढ हे हेतू साध्य करणे.
  • शेतकऱ्यांना आर्थिक मदत होते.


मित्रांनो अधिक महितीसाठी खालील केंद्रास भेट द्या 

"शिवाज्ञा आपले सरकार सेवा केन्द्र”

दु. क्र. ४, राठी कॉम्प्लेक्स, राधाकृष्ण कॉलनी, बस स्टॅन्ड समोर, मोर्शी, जि. अमरावती

75070843439112012151

https://goo.gl/maps/6PMdqiPtvPETn4Ad8


शेतकरी बंधूंनो अशाप्रकारे शासन खूप योजना आपल्या शेतकरी मित्रांसाठी काढत असते. तरी काहीच शेतकरी या योजनांचा लाभ घेतात कारण बर्‍याच शेतकरी बांधवांना माहीतच नसतं. कोणती योजना आली, कोणती योजना सध्या चालू आहे आणि कधी कधी कळते ते वेळ, तारीख संपल्यानंतर. तुम्हाला विविध शासकीय योजनांची माहिती आपल्या मोबाईलवर हवी असेल तर खालील लिंक वरती क्लिक करुन Whatsapp गृपला सामील व्हा...













No comments:

Post a Comment

GMC Chhatrapati Sambhajinagar Bharti 2025: शासकीय वैद्यकीय महाविद्यालय, छत्रपती संभाजीनगर येथे भरती | Tech Shivadnya

GMC Chhatrapati Sambhajinagar Bharti 2025 जाहिरात क्र.: शावैमरुछसंन/सरळसेवा/गट-ड/2365/2025 एकूण: 357 जागा पदाचे नाव & तपशील: पद ...