Sunday, May 22, 2022

कुसुम सोलर पंप योजना 2022

 

महाराष्ट्र कुसुम सोलर पंप योजना


नमस्कार शेतकरी बांधवांनो, कुसुम सोलर पंप योजनेअंतर्गत १६ जिल्ह्यात नवीन कोटा उपलब्ध झालेला आहे. आपण कुसुम सोलर पंपसाठी ऑनलाईन अर्ज सादर करू शकता. कुसुम सोलर पंपाचे कोणत्या जिल्ह्यात किती कोटा उपलब्ध आहेत, त्याचबरोबर कोणत्या प्रवर्गातील शेतकऱ्यांना किती अनुदान देण्यात येते इ. गोष्टी या लेखात पाहुयात.
महाराष्ट्र कुसुम सोलर पंप योजना ऑनलाईन अर्ज कसा व कोठे करावा व कुसुम सोलर पंप योजनासाठी लागणारी कागदपत्रे कोणती, तसेच कोणत्या जमीन धारकास म्हणजेच किती जमीन धारकास किती एचपीचा पंप दिला जातो. या बद्दल संपूर्ण माहिती या लेखात देण्यात आलेली आहे. तर हा लेख शेवटपर्यंत नक्की वाचा संपूर्ण माहिती आपल्याला या एकाच लेखांमध्ये मिळणार आहेत.



या अभियांनातर्गत पुढील ५ वर्षात ५ लक्ष पारेषण विरहीत सौर कृषीपंप आस्थापित करण्यास व त्यापैकी पहिल्या वर्षासाठी मंजूर १ लक्ष पारेषण विरहीत सौर कृषीपंप आस्थापित करण्यास मंजूरी.

सदर अभियान घटक महाराष्ट्र ऊर्जा विकास अभिकरण (महाऊर्जा) मार्फत अर्जदारांचे ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागवून प्रथम येणाऱ्यास प्राधान्य या तत्वावर अनुज्ञेयता तपासून राबविण्यात येणार आहे.

महाराष्ट्र कुसुम सोलर पंप योजनेअंतर्गत राज्यातील शेतकऱ्यांना ३ एच.पी. ते ७.५ एच.पी. पर्यंत सोलर पंप दिले जातात. खुल्या प्रवर्गातील शेतकऱ्यांसाठी ९०% व अनुसूचित जाती व जमाती प्रवर्गातील शेतकऱ्यांसाठी ९५% अनुदानावर सौर कृषीपंप उपलब्ध होतील. योजनेचा लाभ घेण्यासाठी महाऊर्जाच्या संकेतस्थळावर ऑनलाईन पद्धतीने अर्ज करावा. प्रथम येणाऱ्यास प्राधान्य या तत्त्वावर सौर कृषीपंपाचा लाभ देण्यात येईल, असेही प्रसिद्धीपत्रकान्वये कळविण्यात आले आहे.

योजनेचे नाव

महाराष्ट्र कुसुम सोलर पंप योजना

कोणी सुरु केली

महाराष्ट्र शासन व केंद्र शासन

लाभार्थी

राज्यातील शेतकरी

उद्दिष्ट

शेतकऱ्यांना सोलर पंप पुरवणे

अर्ज प्रक्रिया

ऑनलाईन



महाराष्ट्र कुसुम सोलर पंपाचे दर

  • रु. १.५६ लाख (३ HP),
  • रु. २.२२५ लाख (५ HP),
  • रु. ३.४३५ लाख (७.५ HP).



महाराष्ट्र कुसुम सोलर पंपाचे अनुदान

  • सर्वसाधारण प्रवर्ग लाभार्थ्याकडून सौर कृषीपंपाच्या किंमतीच्या 10 %
  • अनुसूचीत जाती व जमातीच्या लाभार्थ्याकडून कृषीपंपाच्या किंमतीच्या 5 %
  • या योजनेंतर्गत केंद्र शासनाचे 30% वित्तीय सहाय्य व राज्य शासनाचे 60/65% अनुदान व लाभार्थ्यांचे 10/5% हिस्सा लागणार.

महाराष्ट्र कुसुम सोलर पंपासाठी लागणारे कागदपत्रे

  • ७/१२ उतारा (विहिर, कुपनलिका शेतात असल्यास ७/१२ उताऱ्यावर नोंद आवश्यक आहे)
  • एकापेक्षा जास्त नावे असल्यास इतर भोगवटदाराचे ना-हरकत प्रमाणपत्र रू. २,००/- च्या मुद्रांक कागदावर सादर करावे लागेल.
  • आधारकार्ड झेरॉक्स प्रत
  • रद्द केलेली धनादेश प्रत / बँक पासबुक प्रत.
  • पासपोर्ट आकाराचा फोटो.
  • शेत जमीन / विहिर / पाण्याचा पंप सामाईक असल्यास इतर भागीदाराचे ना-हरकत प्रमाणपत्र.

महाराष्ट्र कुसुम सोलर पंप योजना लाभार्थी निवड पात्रता

  • शेततळे, विहीर, बोरवेल, बारमाही वाहणारी नदीनाले याच्या शेजारील, तसेच शाश्वत पाण्याचा स्त्रोत उपलब्ध असणारे शेतकरी.
  • पारंपरिक वीज कनेक्शन उपलब्ध नसणारे शेतकरी.
  • अटल सौर कृषी पंप योजना टप्पा - 1 व 2 किंवा मुख्यमंत्री सौर कृषी पंप योजने अंतर्गत अर्ज केलेले तथापि मंजुर न झालेले अर्जदार.

महत्वाची सूचना / माहिती वाचा

  • सेफ लिस्ट मध्ये नाव नसेल तरी अर्ज करू शकता
  • अर्ज पूर्ण भरल्यावर पैसे ७ दिवसाच्या आत मध्ये भरावे लागतील
  • ७ दिवसांच्या आत रकम जमा न केल्यास आपला अर्ज निकाली काढण्यात येईल.
  • आपण उपरोक्त देय रक्कम महाऊर्जाकडे त्वरित जमा करावी यासाठी आपण आपल्या लाभार्थी क्रमांकाचा वापर करून ऑनलाईन रक्कम जमा करू शकता.
  • आपण दाखल केलेल्या कागदपत्रांची प्रत्यक्ष स्थळ पाहणीचे अधीन राहून आपला अर्ज मान्य करण्यात येणार आहे.
  • प्रत्यक्ष स्थळ पाहणी केल्यानंतर निकषात न बसणारे प्रस्ताव रद्द करण्यात येणार असून त्यासाठी जमा केलेली रक्कम आपण सादर केलेल्या बँक खात्यावर जमा करण्यात येईल याची नोंद घ्यावी.
  • याबाबत आपल्याशी कुठलाही पत्रव्यवहार केला जाणार नाही, याची कृपया नोंद घ्यावी.

अर्ज कोठे व कसा करायचा :

ही योजना संपूर्ण महाराष्ट्रभर चालू आहे. या योजनेचा अचूक अर्ज करण्यासाठी शेतकरी बंधुनो तुम्ही "शिवाज्ञा आपले सरकार सेवा केन्द्र” येथे जाऊन अर्ज करू शकता.व त्या अर्जाची पोच पावती घेऊ शकता. काही शंका असल्यास तुमच्या तालुक्याच्या कृषी अधिकारी साहेबांसोबत चर्चा करा. 

मित्रांनो अधिक महितीसाठी खालील केंद्रास भेट द्या 

"शिवाज्ञा आपले सरकार सेवा केन्द्र”

दु. क्र. ४, राठी कॉम्प्लेक्स, राधाकृष्ण कॉलनी, बस स्टॅन्ड समोर, मोर्शी, जि. अमरावती

75070843439112012151

https://goo.gl/maps/6PMdqiPtvPETn4Ad8


शेतकरी बंधूंनो शासन हे अशाप्रकारे खूप योजना आपल्या शेतकरी मित्रांसाठी काढत असते. तरी काहीच शेतकरी या योजनांचा लाभ घेतात कारण बर्‍याच शेतकरी बांधवांना माहीतच नसतं. कोणती योजना आली, कोणती योजना सध्या चालू आहे आणि कधी कधी कळते ते वेळ, तारीख संपल्यानंतर. तुम्हाला विविध शासकीय योजनांची माहिती आपल्या मोबाईलवर हवी असेल तर खालील लिंक वरती क्लिक करुन Whatsapp गृपला सामील व्हा


WhatsApp Group Link

No comments:

Post a Comment

(BMC Bharti) बृहन्मुंबई महानगरपालिकेत भरती | Tech Shivadnya

BMC Recruitment 2024 जाहिरात क्र.:  MPR/7814 एकुण:  1846 जागा पदाचे नाव:  कार्यकारी सहायक (लिपिक) शैक्षणिक पात्रता: (i) 45% गुणांसह वाणिज्य/...