Tuesday, May 31, 2022

फळपीक विमा २०२२ नोंदणीला सुरुवात !

फळपिक विमा २०२२ नोंदणीला सुरुवात

 

फळपिक विमा योजना २०२२:

राज्यात आंबिया बहारासाठी फळ पीकविमा योजनेत सहभाग घेण्याकरिता शेतकऱ्यांकडून नोंदणी अर्ज स्वीकारण्यास सुरुवात झाली आहे. कृषि क्षेत्राच्या उत्पादन वाढीच्या दरामध्ये फळ पिकांचा प्रमुख सहभाग आहे. फळ पिकांचे बाजारमुल्य अधिक असल्याने शेतकऱ्यांना चांगले उत्पन्न मिळते.

येथे क्लिक करा



मात्र फळ पिकाचे अपेक्षित उत्पन्न न आल्यास येणारा तोटाही मोठा असतो. ही बाब विचारात घेऊन शेतकऱ्यांच्या फळ पिकांना हवामान धोक्यांपासुन विमा संरक्षण दिल्यास शेतकऱ्यांचे आर्थिक स्थैर्य अबाधित राखण्याच्या दृष्टीने मदत होईल.

त्यासाठी राज्यात प्राधान्याने सदरची योजना राबविण्यात येत आहे. विविध हवामान धोक्यांमुळे फळ पिकाच्या उत्पादकतेवर विपरीत परीणाम होऊन मोठ्या प्रमाणावर उत्पादनामध्ये घट येते पर्यायाने शेतकऱ्यांना अपेक्षित उत्पादन न मिळाल्याने आर्थिक संकटाला तोंड द्यावे लागते.

या सर्व बाबींचा विचार करुन शेतकऱ्यांना फळपीक नुकसान भरपाई मिळण्यासाठी एक उपाय म्हणून पुनर्रचित हवामान आधारीत पीक विमा योजना राबविणे शासनाच्या विचाराधीन होते.


फळपीक विमा योजना २०२२

पुनर्रचित हवामान, अवकाळी पाऊस, जादा तापमान, अति पाऊस किंवा गारपिट पासून फळ पिकांना विमा संरक्षण मिळवण्याची सुविधा या योजनेत आहे. आंबिया बहाराच्या विमा योजनेत डाळिंब, संत्रा, मोसंबी, काजू, केळी, द्राक्ष, आंबा, पपई व स्ट्रॉबेरी ही पिके असतील. 

राज्याचे मुख्य सांख्यिक विनयकुमार आवटे यांनी दिलेल्या माहिती नुसार, अधिसूचित क्षेत्र व अधिसूचित फळांची माहिती घेण्यासाठी शेतकऱ्यांनी आपापल्या तालुका कृषी अधिकारी कार्यालयास भेट द्यावी. एक शेतकरी एकापेक्षा जास्त फळबागांसाठी देखील या योजनेत भाग घेऊ शकतात. मात्र त्या फळासाठी संबंधित मंडळ अधिसूचित आहे की नाही याची खात्री शेतकऱ्यांना करावी लागेल.

एक शेतकरी चार हेक्टरच्या मर्यादिपर्यंत विमा संरक्षण मिळूवू शकतो. विमा संरक्षित रकमेच्या पाच टक्क्यांच्या मर्यादिपर्यंत शेतकऱ्यांसाठी विमा हप्ता ठेवला जातो. त्यापेक्षा जास्त हप्ता असल्यास केंद्र व राज्याकडून अनुदान दिले जाते. मात्र, असा हप्ता ३५ टक्क्यांपेक्षा जास्त असल्यास शेतकऱ्याला पाच टक्क्यांपेक्षा जादा विमा हप्ता भरावा लागणार आहे.


आवश्यक कागदपत्रे व नोंदणी कशी करावी

बिगर कर्जदारांना सहभाग घ्यायचा असल्यास ही कागदपत्रे गोळा करावी.

  • आधार ओळखपत्र
  • सातबारा
  • आठ अ उतारा
  • पीक लागवडीचे स्वयंघोषणापत्र
  • फळबागेचा टॅगिंग चिन्हांकित केलेले छायाचित्र
  • बँकेचे खातेपुस्तक

अशी कागदपत्रे व माहिती गोळा करावी.

फळबागेचा टॅगिंग चिन्हांकित केलेले छायाचित्र काढण्यासाठी खालील अप्लीकेशनचा उपयोग करावा. 


फळपीक विमा योजना उद्देश

साधारपणे फळपीक विमा योजनेचे उद्देश आहे.

  • नैसर्गिक आपत्ती व हवामानातील प्रतिकूल परिस्थिती मुळे फळ पिकांचे नुकसान झाल्यास शेतकऱ्यांना विमा संरक्षण देणे.
  • पिकांच्या नुकसानीच्या अत्यंत कठीण परिस्थितीतही शेतकऱ्यांचे आर्थिक स्थैर्य अबाधित राखणे.
  • शेतकऱ्यांना नाविन्यपूर्ण व सुधारीत मशागतीचे तंत्रज्ञान व सामुग्री वापरण्यास प्रोत्साहन देणे.
  • कृषि क्षेत्रासाठीच्या पत पुरवठ्यात सातत्य राखणे, जेणेकरून उत्पादनातील जोखमींपासून शेतकऱ्यांच्या संरक्षणावरोबरच अन्नसुरक्षा, पिकांचे विविधीकरण आणि कृषि क्षेत्राचा गतिमान विकास व स्पर्धात्मकतेत वाढ हे हेतू साध्य करणे.
  • शेतकऱ्यांना आर्थिक मदत होते.


मित्रांनो अधिक महितीसाठी खालील केंद्रास भेट द्या 

"शिवाज्ञा आपले सरकार सेवा केन्द्र”

दु. क्र. ४, राठी कॉम्प्लेक्स, राधाकृष्ण कॉलनी, बस स्टॅन्ड समोर, मोर्शी, जि. अमरावती

75070843439112012151

https://goo.gl/maps/6PMdqiPtvPETn4Ad8


शेतकरी बंधूंनो अशाप्रकारे शासन खूप योजना आपल्या शेतकरी मित्रांसाठी काढत असते. तरी काहीच शेतकरी या योजनांचा लाभ घेतात कारण बर्‍याच शेतकरी बांधवांना माहीतच नसतं. कोणती योजना आली, कोणती योजना सध्या चालू आहे आणि कधी कधी कळते ते वेळ, तारीख संपल्यानंतर. तुम्हाला विविध शासकीय योजनांची माहिती आपल्या मोबाईलवर हवी असेल तर खालील लिंक वरती क्लिक करुन Whatsapp गृपला सामील व्हा...













भारतीय सैन्य नर्सिंग सेवा – BSc नर्सिंग कोर्स २०२२ आज शेवटची तारीख

भारतीय सैन्य नर्सिंग सेवा – BSc नर्सिंग कोर्स  २०२२ आज शेवटची तारीख




एकुण : 

  • 220 जागा


कोर्सचे नाव: 

  • Indian Army B.Sc नर्सिंग कोर्स 2022

अ. क्र.

संस्थेचे नाव

उपलब्ध जागा

1

CON, AFMC पुणे

40

2

CON, CH(EC) कोलकाता

30

3

CON, INHS अश्विनी,मुंबई

40

4

CON, AH (R&R) नवी दिल्ली


30

5

CON, CH (CC) लखनऊ

40

6

CON, CH (AF) बंगलोर

40

Total

220




शैक्षणिक पात्रता: 

  • 50% गुणांसह 12वी उत्तीर्ण (फिजिक्स, केमिस्ट्री, बायोलॉजी & इंग्रजी)
  • Neet UG 2022 Registration


हे पण वाचा, डाक विभाग मेगाभरती

येथे क्लिक करा


वयाची अट: 

  • जन्म 01 ऑक्टोबर 1997 ते 30 सप्टेंबर 2005 दरम्यान.


Fee: 

  • General/OBC: ₹200/-   
  • SC/ST: फी नाही


नोकरी ठिकाण: 

  • संपूर्ण भारत


अर्ज करण्याची शेवटची तारीख: 

  • 31 मे 2022


जाहिरात (Notification): पाहा


मित्रांनो अधिक महितीसाठी खालील केंद्रास भेट द्या..

"शिवाज्ञा आपले सरकार सेवा केन्द्र”

दु. क्र. ४, राठी कॉम्प्लेक्स, राधाकृष्ण कॉलनी, बस स्टॅन्ड समोर, मोर्शी, जि. अमरावती

75070843439112012151

https://goo.gl/maps/6PMdqiPtvPETn4Ad8


तुम्हाला विविध शासकीय योजनांची माहिती, नोकरी अपडेट्स  आपल्या मोबाईलवर हवी असेल तर खालील लिंक वरती क्लिक करुन Whatsapp गृपला सामील व्हा...

(ज्यांनी ग्रुप जॉईन नाही केला फक्त  त्यांंच्यासाठी)

WhatsApp Group Link

Monday, May 30, 2022

‘नेट’ ची परीक्षा देणाऱ्यांसाठी अंतीम संधी !

‘नेट’ ची परीक्षा देणाऱ्यांसाठी अंतीम संधी !

UGC - NET डिसेंबर 2021 आणि जून 2022 (मर्जड सायकल्स) साठी अर्ज करण्याच्या तारखेची मुदत आता वाढवण्यात आलेली आहे. आधी 20 मे असणारी ही तारीख आता वाढवून 30 मे करण्यात आलेली आहे. त्यामुळे अर्ज करण्याची आजची शेवटची संधी आहे. ही अर्जाची प्रक्रिया ऑनलाईन आहे. त्यामुळे आता विध्यार्थ्यांना दिलासा मिळणार आहे. ज्यांना वाटत होते की आपली संधी हुकली आता त्यांना नव्याने पुन्हा अर्ज करता येणार आहे. ही माहिती UGC चे चेअरमन एम जगदेश कुमार यांनी दिली.


हे पण वाचा, UGC NET म्हणजे काय ?

येथे क्लिक करा

UGC - NET डिसेंबर 2021 आणि जून 2022 (मर्जड सायकल्स) साठी अर्ज करण्याच्या तारखेची मुदत आता वाढवण्यात आलेली आहे. आधी 20 मे असणारी ही तारीख आता वाढवून 30 मे करण्यात आलेली आहे. ही अर्जाची प्रक्रिया ऑनलाईन आहे. त्यामुळे आता विध्यार्थ्यांना दिलासा मिळणार आहे. ज्यांना वाटत होते की आपली संधी हुकली आता त्यांना नव्याने पुन्हा अर्ज करता येणार आहे. ही माहिती UGC चे चेअरमन एम जगदेश कुमार यांनी दिली.





मित्रांनो अधिक महितीसाठी खालील केंद्रास भेट द्या 

"शिवाज्ञा आपले सरकार सेवा केन्द्र”

दु. क्र. ४, राठी कॉम्प्लेक्स, राधाकृष्ण कॉलनी, बस स्टॅन्ड समोर, मोर्शी, जि. अमरावती

75070843439112012151

https://goo.gl/maps/6PMdqiPtvPETn4Ad8


तुम्हाला विविध शासकीय योजनांची माहिती, नोकरी अपडेट्स आपल्या मोबाईलवर हवी असेल तर खालील लिंक वरती क्लिक करुन Whatsapp गृपला सामील व्हा...



WhatsApp Group Link

Sunday, May 29, 2022

PM किसान eKYC करण्याची तारीख वाढली, ही आहे शेवटची तारीख

PM किसान eKYC करण्याची तारीख वाढली, ही आहे शेवटची तारीख


शेतकर्‍यांना निश्चित उत्पन्न मिळण्याकरीता प्रधानमंत्री किसान सन्मान निधी (PM KISAN) योजने अंतर्गत सरसकट सर्व पात्र शेतकरी कुटुंबीयास (पती, पत्नी व त्यांची १८ वर्षांखालील अपत्ये) रु. २,०००/ - प्रती हप्ता या प्रमाणे ३ हप्त्यात रु. ६,०००/ - प्रती वर्षी लाभ त्यांच्या बँक खात्यात थेट (DBT द्वारे) जमा करण्यात येत आहे.

हे पण वाचा, बियाणे अनुदानासाठी अर्ज सुरु


आज अखेर या योजने अंतर्गत राज्यातील १०९.४६ लाख लाभार्थ्यांना एकुण रक्कम रु. १८,१५१.७० कोटी लाभ अदा करण्यात आलेला आहे. या लाभार्थ्यांना द्यावयाचा लाभ सहजरत्या अदा करता यावा.

म्हणून केंद्र शासनाने प्रधानमंत्री किसान सन्मान निधी (PM KISAN) योजनेच्या लाभार्थ्यांनी त्यांचे e - KYC पडताळणी दिनांक ३१ मे, २०२२ पूर्वी पूर्ण करण्याचे निर्देश दिले होते. तथापी, सदरची e - KYC पडताळणी पुर्ण करण्यासाठी केंद्र शासनाने आता दिनांक ३१ जुलै, २०२२ पर्यंत मुदतवाढ दिलेली आहे.


PM किसान eKYC करण्याची तारीख वाढली ही आहे शेवटची तारीख

लाभार्थ्याना सामाईक सुविधा केंद्र (CSC) मार्फत e - KYC पडताळणी करण्याच्या सुविधा उपलब्ध करण्यात आल्या आहेत. या सुविधेच्या आधारे लाभार्थ्यास त्याची e - KYC पडताळणी करता येईल. 


राज्यात दिनांक २६ मे २०२२ अखेर एकूण ५२.८२ लाख लाभार्थ्याचे e - KYC पडताळणी पुर्ण करण्यात आली आहे. उर्वरीत लाभार्थ्यांनी सामाईक सुविधा केंद्र (CSC) च्या माध्यमातून त्यांचे e KYC पडताळणी केंद्र शासनाने दिलेल्या दिनांक ३१ जुलै २०२२ मुदतीपूर्वी पुर्ण करावे, असे आवाहन करण्यात येत आहे.


बायोमेट्रिक प्रमाणीकरण (eKYC) करण्यासाठी खालील केंद्रास भेट द्या..

"शिवाज्ञा आपले सरकार सेवा केन्द्र”

दु. क्र. ४, राठी कॉम्प्लेक्स, राधाकृष्ण कॉलनी, बस स्टॅन्ड समोर, मोर्शी, जि. अमरावती
75070843439112012151
https://goo.gl/maps/6PMdqiPtvPETn4Ad8


तुम्हाला विविध शासकीय योजनांची माहिती, नोकरी अपडेट्स आपल्या मोबाईलवर हवी असेल तर खालील लिंक वरती क्लिक करुन Whatsapp गृपला सामील व्हा...



WhatsApp Group Link


Saturday, May 28, 2022

PM Kisan योजनेची KYC करण्यासाठी अंतिम संधी

 

PM Kisan योजनेची KYC करण्यासाठी अंतिम संधी


PM Kisan 11th Installment:

लाभार्थ्यांनी ई-केवायसी पूर्ण केली तेव्हाच त्यांना पुढील हप्ता म्हणजेच 11 व्या हप्त्याचे पैसे पीएम किसान योजनेच्या लाभार्थ्यांना मिळतील. ई-केवायसी करण्याची शेवटची तारीख 30 मे 2022 ही आहे.


हे पण वाचा, बियाणे अनुदानासाठी अर्ज सुरु

येथे क्लिक करा


मुंबई : PM Kisan Scheme : 

पीएम किसान योजनेअंतर्गत शेतकऱ्यांना 11व्या हप्त्याची रक्कम मिळणार आहे. कृषी मंत्री नरेंद्र सिंह तोमर यांनी एका कार्यक्रमादरम्यान सांगितले की किसान सन्मान निधीचा 11 वा हप्ता पंतप्रधान 31 मे रोजी देणार आहेत. परंतु 11व्या हप्त्यासाठी शेतकऱ्यांना ई-केवायसी पूर्ण करावे लागेल.


केंद्र सरकारची घोषणा

केंद्र सरकारने आता या योजनेचा लाभ मिळवण्यासाठी अनिवार्य eKYC ची अंतिम मुदत वाढवली आहे. यापूर्वी त्याची अंतिम तारीख 22 मे 2022 होती. पीएम किसान पोर्टलवर (pmkisan.gov.in) ही माहिती देण्यात आली आहे. माहितीनुसार, आता eKYC 30 मे 2022 पर्यंत पूर्ण करता येईल.


ई-केवायसी पूर्ण केली नसल्यास तुमचा हप्ता थांबू शकतो शकतो. लवकरच PM किसान सन्मान निधी योजनेचा 11 वा हप्ता देखील जारी केला जाईल.


बायोमेट्रिक प्रमाणीकरण (eKYC) करण्यासाठी खालील केंद्रास भेट द्या..

"शिवाज्ञा आपले सरकार सेवा केन्द्र”

दु. क्र. ४, राठी कॉम्प्लेक्स, राधाकृष्ण कॉलनी, बस स्टॅन्ड समोर, मोर्शी, जि. अमरावती
75070843439112012151
https://goo.gl/maps/6PMdqiPtvPETn4Ad8


तुम्हाला विविध शासकीय योजनांची माहिती, नोकरी अपडेट्स आपल्या मोबाईलवर हवी असेल तर खालील लिंक वरती क्लिक करुन Whatsapp गृपला सामील व्हा...



WhatsApp Group Link


Thursday, May 26, 2022

(MSC Bank) महाराष्ट्र राज्य सहकारी बँकेत भरती

 (MSC Bank) महाराष्ट्र राज्य सहकारी बँकेत 195 जागांसाठी भरती


जाहिरात क्र.: 01/MSC Bank/2022-2023

  • Total: 195 जागा

हे पण वाचा, डाक विभाग मेगाभरती

पदाचे नाव & तपशील:

पद क्र.

पदाचे नाव

पद संख्या

1

प्रशिक्षणार्थी कनिष्ठ अधिकारी

29

2

प्रशिक्षणार्थी लिपिक

166

Total

195


शैक्षणिक पात्रता:

  • पद क्र.1: (i) 60% गुणांसह कोणत्याही शाखेतील पदवी (ii) 02 वर्षे अनुभव.
  • पद क्र.2: 60% गुणांसह कोणत्याही शाखेतील पदवी.


वयाची अट: 28 फेब्रुवारी 2022 रोजी,

  • पद क्र.1: 23 ते 32 वर्षे
  • पद क्र.2: 21 ते 28 वर्षे


नोकरी ठिकाण:

  • संपूर्ण महाराष्ट्र.


Fee:

  • पद क्र.1: ₹1770/-
  • पद क्र.2: ₹1180/-


Online अर्ज करण्याची शेवटची तारीख:

  • 25 मे 2022 08 जून 2022


परीक्षा (Online):

  • जुलै 2022


जाहिरात (Notification): पाहा



मित्रांनो अधिक महितीसाठी खालील केंद्रास भेट द्या

"शिवाज्ञा आपले सरकार सेवा केन्द्र”

दु. क्र. ४, राठी कॉम्प्लेक्स, राधाकृष्ण कॉलनी, बस स्टॅन्ड समोर, मोर्शी, जि. अमरावती

75070843439112012151

https://goo.gl/maps/6PMdqiPtvPETn4Ad8


तुम्हाला विविध शासकीय योजनांची माहिती, नोकरी अपडेट्स आपल्या मोबाईलवर हवी असेल तर खालील लिंक वरती क्लिक करुन Whatsapp व Telegram गृपला सामील व्हा...




Tuesday, May 24, 2022

UGC NET म्हणजे काय ?

UGC NET म्हणजे काय ?


नॅशनल एलिजिबिलिटी टेस्ट (NET) ज्याला UGC NET असेही म्हणतात सहाय्यक प्राध्यापक किंवा कनिष्ठ संशोधन फेलोशिप (JRF) या पदासाठी उमेदवारांची पात्रता ठरविण्यासाठी दरवर्षी घेतली जाते सुरुवातीलाच चाचणी CBSE द्वारे आयोजित केली जात होती परंतु 2018 पासून नॅशनल टेस्ट एजन्सी (NTA) UGC च्या वतीने NET आयोजित करते .

आजच्या आर्टिकलमध्ये आपण UGC NET म्हणजे काय ? याविषयी माहिती जाणून घेणार आहोत लाखो मुलांना प्रश्न पडत असेल की UGC NET Full Form in Marathi नक्की आहे तरी काय ? चला तर जाणून घेऊया UGC NET विषयी थोडीशी रंजक माहिती


जेआरएफसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांसाठी उच्च वयोमर्यादा 30 वर्षे आहे , तर सहाय्यक प्राध्यापक पदासाठी कोणतीही वयोमर्यादा नाही. UGC NET परीक्षेत JRF आणि AP या दोन्ही पदासाठी दोन पेपर असतात.


UGC NET पेपर एक सर्व उमेदवारांसाठी अनिवार्य आहे तर उमेदवाराला पेपर 2 चा विषय निवड निवडणे आवश्यक आहे अंतिम गुणवत्ता यादी दोन्ही पेपर मधील गुणांच्या आधारे प्रकाशित केली जाते.


श्रेणी

UGC NET वयोमर्यादा

SC / ST , OBC / महिला / PwD / ट्रांसजेंडर

या व्यक्तींसाठी 5 वर्षे वय ( 36 वर्षे पर्यंत )

संशोधनाचा अनुभव असलेले उमेदवार

संशोधनासाठी जास्तीत जास्त 5 वर्षे

LLM पदवी असलेले उमेदवार

3 वर्ष

सशस्त्र दलात सेवा केलेले उमेदवार

5 वर्ष


UGC NET परीक्षेसाठी लागणारी शैक्षणिक पात्रता

शैक्षणिक पात्रता हा सर्वात महत्त्वाचा निकष आहे UGC NET द्वारे निर्देशित केलेल्या पात्रता निकर्षांचे तपशील खालील दिलेले आहेत.

पात्रता :

अर्ज करणाऱ्या उमेदवारांनी मान्यताप्राप्त बोडके व विद्यापीठातून संबंधित क्षेत्रात पदव्युत्तर पदवी असणे आवश्यक आहे.

उपस्थित उमेदवार :

जे उमेदवार त्यांच्या अंतिम परीक्षेत बसलेले आहेत यांचे पदव्युत्तर शिक्षण पूर्ण करत आहेत किंवा निकालाची प्रतीक्षा करत आहेत ते देखील परीक्षेसाठी अर्ज करू शकतात

गुण :

सामान्य उमेदवाराने किमान 55 टक्के एकूण गुण मिळवले पाहिजे राखी उमेदवारांसाठी पाच टक्के सूट दिली जाते ( SD / ST / OBC / PWD / ट्रांसजेंडर आणि इतर )


मित्रांनो अधिक महितीसाठी खालील केंद्रास भेट द्या

"शिवाज्ञा आपले सरकार सेवा केन्द्र”

दु. क्र. ४, राठी कॉम्प्लेक्स, राधाकृष्ण कॉलनी, बस स्टॅन्ड समोर, मोर्शी, जि. अमरावती

75070843439112012151

https://goo.gl/maps/6PMdqiPtvPETn4Ad8


तुम्हाला विविध शासकीय योजनांची माहिती, नोकरी अपडेट्स आपल्या मोबाईलवर हवी असेल तर खालील लिंक वरती क्लिक करुन Whatsapp व Telegram गृपला सामील व्हा...





(BMC Bharti) बृहन्मुंबई महानगरपालिकेत भरती | Tech Shivadnya

BMC Recruitment 2024 जाहिरात क्र.:  MPR/7814 एकुण:  1846 जागा पदाचे नाव:  कार्यकारी सहायक (लिपिक) शैक्षणिक पात्रता: (i) 45% गुणांसह वाणिज्य/...