Monday, September 4, 2023

(Pavitra Portal) पवित्र पोर्टल नोंदणी 2023 | Tech Shivadnya

Pavitra Portal Registration 2023

शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या भरतीसाठी 01 सप्टेंबर 2023 पासून पवित्र पोर्टल प्रणाली खुली झाली आहे. पात्र उमेदवारांची पवित्र पोर्टलवर नोंदणी सुरू करण्यात येत आहेत. सर्व पात्र उमेदवार दिनांक 15 सप्टेंबर 2023 पर्यंत पोर्टल वर रजिस्ट्रेशन करू शकतात. त्यासाठी शिक्षण विभागाने एक नोटीस व फ्लोचार्ट जाहीर केला. 

पवित्र पोर्टल नोंदणी सुरु होण्याची तारीख

  • 01 September 2023

पवित्र पोर्टल नोंदणी करण्याची शेवटाची तारीख

  • 15 September 2023

पवित्र पोर्टल नोंदणी 2023 करीता लागणारे कागदपत्रे


नोंदणीसाठी पात्रता निकष

  • अर्जदार महाराष्ट्राचा नागरिक असणे आवश्यक आहे.
  • महाराष्ट्र शिक्षक अभियोग्यता आणि बुद्धिमत्ता चाचणी (Maha TAIT 2023) परीक्षा दिलेली उमेदवारच नोंदणी करू शकतील.
  • इयत्ता 01 ते 05 साठी उमेदवाराचे D.T.Ed / D.Ed उत्तीर्ण आणि TET / CTET (पेपर 1) उत्तीर्ण असणे आवश्यक आहे.
  • इयत्ता 06 ते 08 साठी उमेदवाराचे D.T.Ed / D.Ed / B.Ed उत्तीर्ण आणि TET / CTET (पेपर 2) उत्तीर्ण असणे आवश्यक आहे.
  • इयत्ता 09 ते 12 साठी उमेदवाराचे B.Ed आणि Post Graduation उत्तीर्ण असणे आवश्यक आहे.



पवित्र पोर्टल नोंदणी 2023 नंतरची प्रक्रिया

  • पवित्र पोर्टल नोंदणी 2023 नंतर उमेदवारास त्याच्या शैक्षणिक पात्रतेच्या आधारे जिल्हा परिषद, नगर परिषद, महानगरपालिका आणि खाजगी संस्था येथील शिक्षकांच्या रिक्त पदांचा तपशील जाहीर होणार आहे. त्यानुसार उमेदवार आपल्या आवडीनुसार 20 शाळा निवडाव्या लागणार आहे. त्यानंतर पात्र उमेदवाराची निवड यादी जाहीर करण्यात येईल.


पवित्र पोर्टलचे फायदे

  • पवित्र पोर्टल महाराष्ट्र राज्यातील सर्व विद्यार्थ्यांना शिक्षक भरतीसाठी अर्ज करण्याची ऑनलाइन सुविधा पुरवते.
  • अर्जासाठी पवित्र पोर्टलवर त्यांचे खाते (Account) तयार करून विद्यार्थी सहजपणे शिक्षक भरतीसाठी अर्ज करू शकतात.
  • आता राज्यातील शिक्षक भरतीसाठी अर्ज करण्याची प्रक्रिया पवित्र पोर्टलवर उपलब्ध करून देण्यात आली आहे.
  • पवित्र पोर्टलवर महाराष्ट्रातील प्रत्येक जिल्हा आणि विभागातील रिक्त पदांचा संपूर्ण तपशील महाराष्ट्र शिक्षण विभाग उपलब्ध करून देणार आहे. राज्यातील सर्व विभागातील विद्यार्थ्यांना पोर्टलवर शिक्षक भरतीसाठी अर्ज करण्याची सुविधा उपलब्ध करून देण्यात येणार आहे.


अधिक महितीसाठी खालील केंद्रास भेट द्या..

"शिवाज्ञा आपले सरकार सेवा केन्द्र”

दु. क्र. ४, राठी कॉम्प्लेक्स, राधाकृष्ण कॉलनी, बस स्टॅन्ड समोर, मोर्शी, जि. अमरावती


तुम्हाला विविध शासकीय योजनांची माहिती, नोकरी अपडेट्स आपल्या मोबाईलवर हवी असेल तर खालील लिंक वरती क्लिक करुन WHATSAPP व TELEGRAM गृपला सामील व्हा...




No comments:

Post a Comment

GMC Chhatrapati Sambhajinagar Bharti 2025: शासकीय वैद्यकीय महाविद्यालय, छत्रपती संभाजीनगर येथे भरती | Tech Shivadnya

GMC Chhatrapati Sambhajinagar Bharti 2025 जाहिरात क्र.: शावैमरुछसंन/सरळसेवा/गट-ड/2365/2025 एकूण: 357 जागा पदाचे नाव & तपशील: पद ...